काँग्रेसचे स्वपक्षीय अपक्षांवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:39 AM2017-08-12T05:39:06+5:302017-08-12T05:39:06+5:30
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसने यंदाच्या पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात एबी फॉर्म देण्यास विलंब झाल्याने ऐन निवडणुकीत पक्षाच्या तीन उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसने यंदाच्या पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात एबी फॉर्म देण्यास विलंब झाल्याने ऐन निवडणुकीत पक्षाच्या तीन उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. हे तिन्ही उमेदवार पक्षासाठी महत्त्वाचे मानले जात असल्याने या उमेदवारांच्या विजयाकडे लक्ष लागलेले आहे.
काँग्रेसने यंदाच्या पालिका निवडणुकीत ७६ उमेदवार उभे केल्याचा दावा केला असला तरी त्याहून अधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात पक्षाकडून एबी फॉर्म विलंबाने मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. त्यात प्रभाग १९ मध्ये राजीव मेहरा, प्रभाग ९ मध्ये अमजद गफ्फूर शेख, प्रभाग २० मध्ये रूपा पिंटो यांचा समावेश आहे. यातील प्रभाग ९ व १९ मधील उमेदवार राष्टÑवादीतून काँग्रेसमध्ये आले आहेत. असाच प्रकार आणखी उमेदवारांच्या बाबतील घडल्याने त्यांनी मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास नापसंती दर्शवली.
काँग्रेसचा प्रचार भाजपाविरोधी नाही, तर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे. दुसºया बाजूला काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावण्याचे भाष्य करून सेनेसोबत जाणार असल्याचे संकेत देत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची १६ आॅगस्टला मीरा रोडमधील शांतीनगर सेक्टर २ व ३ येथे सभा होणार आहेत. तत्पूर्वी १३ आॅगस्टला मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांच्या सभा होणार आहेत. त्यात भार्इंदर पूर्वेकडील प्रभाग ३, पश्चिमेकडील प्रभाग १, मीरा रोड येथील कनाकिया परिसरातील प्रभाग १२ व हाटकेशमधील प्रभाग १३ मध्ये सभा होतील. याखेरीज, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उद्योगमंत्री नारायण राणे, गुरुदास कामत यांनाही प्रचारासाठी निमंत्रित करणार असल्याचे समजते.