पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:34+5:302021-03-20T04:40:34+5:30

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागातील मोहन सबरबया आणि नॅनो सिटी या परिसरात पाणी असतानादेखील टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

Automated system for water scarcity | पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा

पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा

Next

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागातील मोहन सबरबया आणि नॅनो सिटी या परिसरात पाणी असतानादेखील टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गृहसंकुलाला एमआयडीसीची स्वतंत्र जलवाहिनी टाकली असून तिचे व्हॉल्व्ह योग्य पद्धतीने नियंत्रित होत नसल्याने आता स्वयंचलित व्हॉल्व्ह बसवण्याचे काम बांधकाम व्यावसायिकाने हाती घेतले आहे.

या भागातील पाणीटंचाई संदर्भात स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि चरण रसाळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने पाटील यांनी बांधकाम व्यावसायिकांसोबत बैठक घेऊन या गृहसंकुलातील सर्व समस्यांवर चर्चा केली होती. या चर्चेअंती पाणीपुरवठ्यासंदर्भात योग्य नियोजन करण्याचे आश्वासन गांधी यांनी दिले होते. त्यानुसार या गृहसंकुलात स्वयंचलित यंत्रणा बसविण्याच्या कामाचा शुभारंभ चरण रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. ते पूर्ण झाल्यावर गृहसंकुलातील प्रत्येक फेजला पाण्याचे समान वाटप होईल, असा विश्‍वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

-

Web Title: Automated system for water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.