चार हजारांहून अधिक गीते रचणारा अवलिया हलाखीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:26+5:302021-07-18T04:28:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कसारा : महाराष्ट्रातील मातब्बर गायकांसाठी चार हजारांहून अधिक गीते रचणारे ७४ वर्षीय गीतकार प्रकाश पवार हे ...

Awaliya Halakhit, who composed more than four thousand songs | चार हजारांहून अधिक गीते रचणारा अवलिया हलाखीत

चार हजारांहून अधिक गीते रचणारा अवलिया हलाखीत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कसारा : महाराष्ट्रातील मातब्बर गायकांसाठी चार हजारांहून अधिक गीते रचणारे ७४ वर्षीय गीतकार प्रकाश पवार हे सध्या हलाखीचे दिवस काढत आहेत. तुटके घर, गळके छप्पर आणि कुटुंबाच्या उदनिर्वाहाचा प्रश्न अशा संघर्षमय परिस्थितीला पवार यांना ताेंड द्यावे लागत आहे. पैसा नसल्यामुळे घर दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे शासनाने मदतीचा हात पुढे करावा, तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न साेडवावा, अशी त्यांची माफक मागणी आहे.

१९७४ पासून आपल्या कला-गुणांच्या आधारे मनाेरंजन करणारे पवार हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे एका १५ बाय १० च्या एका पडक्या घरात राहत आहेत. दोन अपत्ये असलेल्या पवार यांचा माेठा मुलगा कवी देवदत्त पवार आणि सुनेचा काही वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. तर लहान मुलगा बिगारी काम करून कुटुंबाला हातभार लावत आहे. त्यात भागत नसल्याने आठ जणांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण सुरू आहे. या हलाखीच्या परिस्थितीत त्यांची पत्नी नातवंडांसह सर्वांची काळजी घेऊन संसार चालवत आहे. तुटलेल्या कारव्याच्या भिंती, गळके छप्पर, जमिनीला येणारा ओलावा आणि उंदीर-घुशींचा उपद्रव अशा वेदनादायी परिस्थितीत हे कुटुंब राहत आहे.

‘चांडाळ चौकडी’ या चित्रपटासाठी पवार यांनी गीत लिहिले हाेते. या गाण्यासह लोकगीत, लोकसंगीत, कोळीगीत, भारूड, भीमगीत, बुद्ध गीत, भक्तिगीते लिहून त्यांनी संगीत क्षेत्राला भरभरून दिले आहे. गायक प्रल्हाद शिंदे, उत्तरा केळकर, रंजना शिंदे, मिलिंद शिंदे, आनंद शिंदे अशा नामांकित गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत. ‘घ्या ग कुणी कुंकू घ्या, कुणी काळे मनी, बाई सुया घे ग धाभण घे’ हे लाेकगीत आताही रसिक प्रेक्षकांच्या मनात आहे. या अवलियाने मिळवलेले पुरस्कार, प्रमाणपत्र, ट्राॅफी हे शाेभेच्या वस्तू बनल्या आहेत. या परिस्थितीला वैतागून त्यांनी ही आयुष्यभराची कमाई जागेअभावी एका पेटीत बंद केली आहे.

चाैकट

‘राेजीराेटी, घराचा प्रश्न साेडवा’

७४ वर्षीय पवार या कलाकाराने शासनाकडे घर आणि राेजीराेटीचा प्रश्न साेडविण्याची मागणी केली आहे. मायबाप सरकारने माझ्या छोट्या मुलास सरकारी नको, पण खासगी तरी नोकरी मिळवून द्यावी. तसेच माझे पडके घर दुरुस्त करून द्यावे. आज मी हलखीचे दिवस काढत आहे. मात्र, माझ्या कुटुंबावर ती वेळ येऊ नये म्हणून मायबाप सरकारने या फाटक्या कलाकाराकडे लक्ष द्यावे, अशी विनंती पवार यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री यांच्यावर पवार यांचा मुलगा देवदत्त याने गीत रचले हाेते. आठवले यांचे कसारा येथे येणे-जाणे असते. त्यामुळे या परिस्थितीतून पवार कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

160721\3256img_20210716_134807.jpg~160721\3256img_20210716_125602.jpg

कवी प्रकाश पवार यांचे पडके घर~पडके घर

Web Title: Awaliya Halakhit, who composed more than four thousand songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.