दिवाळी पहाटेवेळीही साहित्य संमेलन जागृती

By admin | Published: October 28, 2016 03:37 AM2016-10-28T03:37:28+5:302016-10-28T03:37:28+5:30

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटेपासूनच येथील फडके रोडवर तरुणाई लोटते. या तरुणाईला अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे

Awareness meeting awakening during Diwali dawn also | दिवाळी पहाटेवेळीही साहित्य संमेलन जागृती

दिवाळी पहाटेवेळीही साहित्य संमेलन जागृती

Next

डोंबिवली : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटेपासूनच येथील फडके रोडवर तरुणाई लोटते. या तरुणाईला अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे वळवण्यासाठी ‘आगरी युथ फोरम’तर्फे गणेश मंदिर संस्थानच्या व्यासपीठावर आवाहन केले जाणार आहे.
डोंबिवलीतील गणपती मंदिरात गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी ६.३० पासून तरुणाई शुभेच्छा देण्यासाठी फडके रोडवर जमते. अप्पा दातार चौकात तरुणांसाठी गणेश मंदिरातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून तरुणाईला आवाहन केले जाणार आहे. या वेळी आगरी युथ फोरमचे गुलाब वझे, रामकृष्ण पाटील, शरद पाटील, पांडुरंग म्हात्रे, मसापचे सुरेश देशपांडे, गणेश मंदिर संस्थानचे अच्युत कराडकर, प्रवीण दुधे सहभागी होतील.
तरुणांना साहित्य संमेलनात स्वयंसेवक होण्यासाठी त्यात आवाहन केले जाईल. तरुणाईने संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात प्रत्येकी एक पुस्तक खरेदी करावे. त्यातून विक्रमी पुस्तकविक्री डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात होईल, असे आवाहन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Awareness meeting awakening during Diwali dawn also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.