चित्ररथांद्वारे सामाजिक अर्थसाहाय्य योजनांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:39+5:302021-03-07T04:37:39+5:30
ठाणे : जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना तसेच कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ...
ठाणे : जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना तसेच कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. आता हा रथ जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, अर्थसाहाय्य विभागाच्या विविध योजना आदींच्या चित्रफिती या चित्ररथामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या चित्ररथाद्वारे राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान, जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, वीजजोडणी आकार व सूक्ष्म संचासाठी तीन लाख ३५ हजार तसेच रमाबाई आवास योजना आदींची जनजागृती करण्यात येत आहे.
-----------------------