गणेशोत्सवात मतदार नोंदणीसाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:46 AM2021-09-15T04:46:55+5:302021-09-15T04:46:55+5:30

भिवंडी : भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती घेतला आहे. सध्या कोरोना आटोक्यात असल्याने शासकीय नियमांचे ...

Awareness for voter registration in Ganeshotsav | गणेशोत्सवात मतदार नोंदणीसाठी जनजागृती

गणेशोत्सवात मतदार नोंदणीसाठी जनजागृती

Next

भिवंडी : भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती घेतला आहे. सध्या कोरोना आटोक्यात असल्याने शासकीय नियमांचे पालन करून ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भिवंडी महसूल विभागाकडून ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ अशी अनोखी मतदार जनजागृती मोहीम भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी शहरात राबविली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व धार्मिक स्थळांबरोबरच ज्या-ज्या ठिकणी नागरिकांचे रोजचे येणे जाणे आहे, अशा ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी ही मोहीम राबविली असून मतदार नोंदणी जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले आहेत.

भिवंडीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय मोर्चे बांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महसूल व निवडणूक विभागाकडून शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदारनोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र अनेक वेळा नागरिकांना मतदार नोंदणी करतांना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडतो, ज्याचा फायदा काही राजकीय पुढारी तर कधी मतदार यादीत नाव चढविण्यासाठी दलाल आर्थिक व्यवहार करून मतदारांकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत असतात. या सर्व बेकायदा प्रकारांना आळा बसावा व जास्तीत जास्त नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपले मतदार यादीत नाव नोंदविणे शक्य व्हावे म्हणून भिवंडी प्रांताधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ अशी अनोखी मतदार जनजागृती मोहीम भिवंडीत सुरू केली आहे. या मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून नागरिकांना किचकट वाटणारी मतदान नोंदणी या मोहिमेतून सुलभ होणार असल्याची भावना दक्ष भिवंडीकर व्यक्त करीत आहेत.

काेट

कोरोनाकाळात मतदार जनजागृती करता आली नाही, त्यामुळे आता सार्वजनिक गणेश मंडळ, धार्मिक स्थळे, मार्केट व जिथे नागरिक जास्त ये-जा करतात, अशा सर्वच ठिकाणी ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तसे बॅनर ठिकठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये निश्चितच जनजागृती होईल व मतदार नोंदणीसाठी जास्तीत जास्त नागरिक स्वतः पुढाकार घेतील.

बाळासाहेब वाकचौरे,प्रांताधिकारी, भिवंडी

Web Title: Awareness for voter registration in Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.