भन्नाट! भिवंडीत तरंगणारे रेस्टॉरंट;`स्काय डाईंग'चा अनोखा आविष्कार

By नितीन पंडित | Published: November 21, 2022 10:04 PM2022-11-21T22:04:26+5:302022-11-21T22:04:45+5:30

भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील सया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये यशस्वीपणे सुरू झालेल्या या स्काय डाईंग प्रकल्पाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आनंद व्यक्त केला

Awesome! A floating restaurant in Bhiwandi; a unique invention of ``Sky Dying'' | भन्नाट! भिवंडीत तरंगणारे रेस्टॉरंट;`स्काय डाईंग'चा अनोखा आविष्कार

भन्नाट! भिवंडीत तरंगणारे रेस्टॉरंट;`स्काय डाईंग'चा अनोखा आविष्कार

googlenewsNext

भिवंडी - बंगळूर, गोवा, पुण्यापाठोपाठ मुंबई-ठाणे परिसरात प्रथमच भिवंडी तालुक्यातील अंजुर येथे हवेत तरंगणारे रेस्टॉरंट सुरू झाले असून रविवारी केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते स्काय डाईंग रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आला. मुंबई परिसरात प्रथमच अंजुर येथील साया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये सुरू झाले असून या रेस्टॉरंटमध्ये एकाच वेळी २२ पर्यटकांना चांदणे व आकाशाच्या सान्निध्यात हवेत तरंगत रेस्टॉरंटमध्ये नवा अनुभव अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील सया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये यशस्वीपणे सुरू झालेल्या या स्काय डाईंग प्रकल्पाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून या प्रकल्पाचा पर्यटकांनी आवर्जून लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला देशात पाच पर्यटक पाठविण्याचे आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर मुंबई-ठाणे परिसरातील नागरिकांनी भिवंडीत पाच पर्यटक पाठवावेत, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. उद्घाटनाच्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, सया ग्रॅण्ड रिसॉर्टचे मालक जगदीश पाटील, उमेश पाटील, स्काय डाईंगचे मालक चिराग चंदन व गणेश केकणे आदींनी हवेत तरंगत अल्पोपहाराचा आनंद लुटला.

Web Title: Awesome! A floating restaurant in Bhiwandi; a unique invention of ``Sky Dying''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.