ठाणे जिल्ह्यातील नळपाणी पुरवठ्याच्या कामांसह आयुष्यमानच्या कामांची जि प. सीईओंकडून झाडाझडती!

By सुरेश लोखंडे | Published: October 14, 2023 05:58 PM2023-10-14T17:58:22+5:302023-10-14T17:59:40+5:30

त्यास अनुसरून त्यांनी मुरबाडला भेट देउन या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ayushman works along with water supply works checking in thane district from ceo | ठाणे जिल्ह्यातील नळपाणी पुरवठ्याच्या कामांसह आयुष्यमानच्या कामांची जि प. सीईओंकडून झाडाझडती!

ठाणे जिल्ह्यातील नळपाणी पुरवठ्याच्या कामांसह आयुष्यमानच्या कामांची जि प. सीईओंकडून झाडाझडती!

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गांवखेड्यांना नळपाणी पुरवठा करणाऱ्या जलजीवन मिशनचे कामे माेठ्याप्रमाणात सुरू आहे. जिल्ह्याभरातील या कामांसह आयुष्यमान भारत कार्डच्या कामांची झाडाझडती ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून सुरू झाली आहे. त्यास अनुसरून त्यांनी मुरबाडला भेट देउन या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

गांवखेड्यातील ग्रामस्थांच्या नळपाणी पुरवठा याेजनेसाठी जलजीवन मिशनची कामे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी काेटींचा निधी खर्च हाेत आहे. त्यामुळे या कामाचा लाभ गांवकऱ्याना हाेणे अपेक्षित आहे. त्यास अनुसरून सीईओ यांनी मुरबाड पंचायत समितीच्या सभागृहात आमदार किसन कथाेरे यांच्या समवेत खाते प्रमुखांच्या आढावा घेऊन केंद्र व राज्य पुरस्कृत योजना व घरकुलच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

पंचायत समितीच्या या आढावा बैठकीनंतर सीईओ यांनी न्हावे ग्राम पंचायतीला भेट दिली. तेथील जल जिवन मिशनचे काम व घरकुलांच्या कामांची यावेळी सीईओ यांनी पाहणी केली. याप्रमाणेच ग्रामपंचायत मासले येथे आयुष्यमान भारत कार्डच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामसेवक, आशा सेविका, गटप्रवर्तक व वैद्यकिय अधिकारी यांना कामे वेळेत पुर्ण करण्यासंदर्भांत सुचित करून दिवसभरात तब्बल पाच हजार कार्ड तयार करण्याची अपेक्षा सीईओंनी या भेटी दरम्यान व्यक्त केली. दरम्यान सीईओ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र किशोर येथे भेट देऊन आराेग्य यंत्रणेची पाहणी केली. ग्रामपंचायत मासले येथे आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात भेट देऊन ग्रामसेवक, आशा सेविका, गटप्रवर्तक व वैद्यकिय अधिकारी यांना कामे वेळेत पुर्ण करण्यासंदर्भांत सुचित करण्यात आले.

Web Title: ayushman works along with water supply works checking in thane district from ceo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.