बाबा रामदेव यांचा स्वदेशी ‘योग’नारा
By admin | Published: January 23, 2016 02:50 AM2016-01-23T02:50:26+5:302016-01-23T02:50:26+5:30
फेस क्रिम लावून कोणी गारे होत नाही. तसेच ‘कुछ तुफानी हो जाये..’ या जाहिरातीत जे शीतपेय आहे, ते थंड पेय नसून कार्बोनेट वॉटर आहे.
ठाणे : फेस क्रिम लावून कोणी गारे होत नाही. तसेच ‘कुछ तुफानी हो जाये..’ या जाहिरातीत जे शीतपेय आहे, ते थंड पेय नसून कार्बोनेट वॉटर आहे. घरातील स्वच्छता गृह स्वच्छ करण्यासाठी त्याचा चांगला वापर होऊ शकतो असा स्वदेशी नारा देत स्वदेशी उत्पादनांचा वापर करुन आपल्या देशातील अर्थकारण वाढीस लावा असा संदेश योगगुरु बाबा रामदेव यांनी बुधवारी ठाण्यात दिला.
येथील दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये मधूसुदन ग्रुप व पतंजली योग समिती ठाणे यांच्या वतीने योग दिक्षा सभेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, संजय केळकर, नरेश म्हस्के, रविंद्र फाटक, राकेश मोदी, नरेन्द्र जैन, मोहन तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी योग गुरु रामदेव बाबा यांनी सांगितले की, पतंजली हा भारतातील नंबर वन ब्रॅण्ड करणार. विदेशी वस्तूच्या वापरामुळे विदेशी कंपन्यांना आर्थिक फायदा होतो. स्वदेशी उत्पादने वापरल्यास गंगाजळी भारतात राहील. तिचा देशाच्या विकासासाठी उपयोग होईल. एक विदेशी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. भारत गुलामीत गेला. आजही भारत देश विदेशी कंपन्यांच्या आर्थिक गुलामीतून मुक्त झालेला नाही. तो मुक्त करण्याची जबाबदारी ही राष्ट्रभिमान बाळगणाऱ्या सगळ््याच प्रत्येक सुजाण नागरीकांची आहे असे रामदेव बाबा यांनी सांगितले. रिफाईंड तेल, केसांना लावले जाणारे विदेशी कंपन्यांचे तेल हे कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण देणारे ठरते. पतंजलीच्या उत्पादनातून मिळणारा पैसा हा एखाद्या व्यक्तिच्या खिशात जात नसून तो सेवा क्षेत्रासाठी वापरला जातो. आपल्या देशात न्यूट्रीशियन एज्युकेशन कमी आहे. त्यामुळे विदेशी कंपन्यांचे चांगलेच फावले आहे. हे चित्र आपल्याला बदलावे लागेल. पतंजली रोजगार व आरोग्य देण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही रामदेव बाबा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)