बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:12+5:302021-07-25T04:33:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बाळ वारंवार डायपर ओले करीत असेल तर ते टाइप-१ डायबिटीज असतो. हे अनेक महिलांना ...

The baby frequently wets diapers; See a doctor immediately! | बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा !

बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : बाळ वारंवार डायपर ओले करीत असेल तर ते टाइप-१ डायबिटीज असतो. हे अनेक महिलांना माहीत नाही. लक्षणे आढळत असतील तर त्वरित बालरोगतज्ज्ञांना दाखविण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुलांमध्ये टाइप-१ डायबिटीज वाढत आहे आणि ही चिंतेची बाब आहे.

ही आहेत लक्षणे

(८ - १२ वर्षांपासून पुढील मुलांमधील लक्षणे)

१. अचानक वजन कमी होणे

२. खूप तहान लागणे

३. खूप भूक लागणे

४. जास्त लघवी होणे

५. खूप दम लागणे

६. ऊर्जा कमी होणे

(३-४ वर्षांच्या मुलांमधील लक्षणे)

या वर्षांच्या मुलांमध्ये इन्फेक्शनमुळे लक्षणे दिसायला लागतात. त्यात दम लागणे, अशक्तपणा, शुद्ध हरपणे ही लक्षणे आढळून येतात.

------------------------------

ही घ्यावी काळजी?

मुलांतील ग्रोथ चार्ट बघणे आवश्यक आहे. वजन आणि उंचीमध्ये अचानक बदल होतोय का, हा बदल लक्षणीय आहे का? वयाप्रमाणे उंची आणि वजन कसे वाढतेय हे डॉक्टरांकडून तपासून घेणे आवश्यक आहे. आधी मूल बिछान्यात लघवी करत नव्हते, पण अचानक ते बिछाना ओला करायला लागल्यास त्वरित डॉक्टरांना दाखविणे. तसेच, सकस आणि समतोल आहार लहान मुलांना देणे गरजेचे आहे.

------------------------------

लहान मुलांतील टाइप-१ डायबिटीज हा आनुवंशिक नसतो. आईवडिलांना मधुमेह नसला तरी लहान मुलांना होऊ शकतो. मात्र आईवडिलांना मधुमेह असेल तर लागण मुलांना होण्याची शक्यता जास्त असते. लहान मुलांतील मधुमेह वाढत आहे हे निश्चित. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, याचा कोविडशी संबंध आहे का यावर चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत अजून पुरावे नाहीत. लहान मुलांची आहारशैली आणि जीवनशैली बदलण्याची गरज आहे.

- डॉ. संदीप केळकर, बालरोगतज्ज्ञ

------------------------------

मधुमेह हा सायलेंट किलर रोग आहे. त्याचे निदान जितक्या लवकर होईल तितके चांगले असते. लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण जास्त वाढले. याला कारण म्हणजे लहान मुलांची शारीरिक हालचाल थांबली, हॉटेल बंद असल्याने ऑनलाइन बाहेरचे खाद्यपदार्थ मागविण्याचे प्रमाण वाढले. त्याने लठ्ठपणा वाढला. वजन वाढू लागले. शाळा बंद, मित्र दिसत नाहीत. त्यामुळे मानसिक ताण त्यांच्यात दिसू लागला आहे.

- डॉ. उमेश आलेगावकर, मधुमेहतज्ज्ञ

Web Title: The baby frequently wets diapers; See a doctor immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.