६० उद्योगांचे भूखंड घेतले परत
By admin | Published: November 19, 2015 01:53 AM2015-11-19T01:53:30+5:302015-11-19T01:53:30+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाक डून (एमआयडीसी) अत्यल्प दरात भूखंड मिळवून वर्षानवर्षे त्यावर उद्योग सुरू न करणाऱ्या ठाणे, पालघर जिल्ह्यांसह मुंबईतील
- पंकज रोडेकर, ठाणे
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाक डून (एमआयडीसी) अत्यल्प दरात भूखंड मिळवून वर्षानवर्षे त्यावर उद्योग सुरू न करणाऱ्या ठाणे, पालघर जिल्ह्यांसह मुंबईतील २३९ भूखंडधारकांना ठाणे एमआयडीसीने नोटीसा बजावल्या आहेत. ६० जणांकडून भूखंड परत घेतले आहेत. यापैकी काही भूखंडधारकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
केंद्रात भाजपा सरकार आल्यावर सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘मेक इन महाराष्ट्र’ योजना राबवण्याचे ठरवले. यासाठी मोठ्या प्रमाणात औद्योगिक भूखंडाची गरज आहे. आतापर्यंत एमआयडीने रस्ते, पाणी पुरवठा, वीज आदी सुविधा देऊन औद्योगिक भूखंड विकसित करून उद्योगांना बाजारभावाच्या तुलनेत कमी किमतीत दिले. त्यामुळे हे भूखंड मिळवण्यासाठी स्पर्धा होती. मात्र, अनेकजण स्वस्तात भूखंड घेऊन वर्षानुवर्षे उद्योगच उभारत नाहीत. परिणामी एमआयडीसीचा हेतू असफल ठरतो व रोजगार निर्मितीला खीळ बसते. एमआयडीसीच्या सर्वेक्षणात ठाणे, पालघर या जिल्ह्यांसह मुंबईतील मरोळ या ठाणे प्रादेशिक प्राधिकरण १ आणि २ कार्यक्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रात २३९ भूखंड हे वापराविना पडून असल्याचे आढळले. यामध्ये मीरा रोड औद्योगिक क्षेत्रात एकही भूखंड वापराविना नाही तर सर्वाधिक ७२ भूखंड डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात वापराविना पडून आहेत. त्यापाठोपाठ तारापूरचा नंबर लागतो.
तारापूरचे ८ भूखंड ताब्यात
सर्वाधिक ८ भूखंड तारापूर औद्योगिक क्षेत्रातून ताब्यात घेतले आहेत. त्यापाठोपाठ कल्याण-भिवंडीत ७ भूखंड ताब्यात घेतले आहेत. इतर भूखंडधारकांकडून एमआयडीसीच्या नोटिसला उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. समाधानकारक कारण न आढळल्यास ते देखील परत घेतले जाणार आहेत. काही भूखंडधारकांनी या कारवाईच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे विभाग १ या कार्यक्षेत्रात तारापूर, ठाणे (वागळे), मरोळ, मिरा, आणि डोंबिवली तर २ या कार्यक्षेत्रात अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड आणि अतिरिक्त मुरबाड, कल्याण-भिवंडी व अतिरिक्त कल्याण-भिवंडी हा औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे.
कारवाईची आकडेवारी
औद्योगिक क्षेत्रनोटिसा परत
बजावलेले घेतलेले
भूखंडभूखंड
तारापूर४००८
ठाणे३८०६
मरोळ१६०१
मीरा ००००
डोंबिवली७२०६
अंबरनाथ०५००
अति.अंबरनाथ०७०२
बदलापूर०७०१
मुरबाड आणि अति.
मुरबाड४७२९
कल्याण-भिवंडी००००
अति.कल्याण-भिवंडी०७०७
एकूण२३९६०