भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यावर तात्पुरती डागडुजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 03:40 PM2021-08-05T15:40:12+5:302021-08-05T15:40:32+5:30

या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला

Bad condition of Chinchoti Mankoli road in Bhiwandi; Temporary repairs to the road by the PWD | भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यावर तात्पुरती डागडुजी 

भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यावर तात्पुरती डागडुजी 

Next

नितिन पंडीत 

भिवंडी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून नुकताच २२ जुलै रोजी वडघर गावातील २० वर्षीय तरुण तेजस अभिमन्यू पाटील याचा या महामार्गावरील खड्डयांमुळे जीव गेला आहे. तर मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी ठाण्यातील हर्ष विनोद सिंह या २६ वर्षीय तरुणाचा कालवार गावाजवळ खड्डे वाचविताना अपघातात मृत्यू झाला आहे . असे अनेक अपघात या महामार्गावर झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे . मात्र या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे , तर दुसरीकडे सुप्रीम कंपनीकडून टोल वसुली मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे रस्त्याची दुरावस्था व त्यामुळे होणारे अपघात तर दुसरीकडे रोज होणारी टोल वसुली या सर्व बेजबाबदार कारभारामुळे टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत .

विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणेसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने केले आहे . राज्य शासनाने टोल कंपनीच्या अनामत रक्कमेतून तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केला होता. मात्र दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराने थातूरमातूर दुरुस्ती केल्याने आता या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत , तर वळ पाडा ,  मानकोली, अंजुरफाटा, बहात्तर गाळा , कालवार , वडघर , खारबाव येथे रस्त्याची अक्षरशा दुरावस्था झाली आहे. 

या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या महामार्गाच्या रस्त्यावर माती मिश्रित खाडी टाकून खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. मात्र या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने व पाऊस पडला कि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर टाकलेली खाडी सर्वत्र पसरते ज्यामुळे दुचाकी स्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याचा दिखावा करू नये , तर कायम स्वरूपी खड्डे भरावे व रस्ता सुस्थितीत करावा असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील स्थानिक नागरिकांनी संघर्ष समितीच्या वतीने दिला आहे . 

सध्या काही ठिकाणी खाडी तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने खड्डे भरण्याचे काम सुरु असून पावसाने उघडीप दिली की या रस्त्यावरील खड्डे आरएमसी काँक्रेट व डांबराने भरण्यात येतील अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी शाखेचे अभियंता सचिन धात्रप यांनी दिली आहे. 

Web Title: Bad condition of Chinchoti Mankoli road in Bhiwandi; Temporary repairs to the road by the PWD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.