भिवंडीतील काल्हेर कशेळी अंजुर फाटा रस्त्याची प्रचंड दुरावस्था
By नितीन पंडित | Published: April 8, 2023 06:48 PM2023-04-08T18:48:58+5:302023-04-08T18:49:04+5:30
भिवंडी ते ठाणे दरम्यान बिओटी तत्वावर बनविलेल्या अंजुर फाटा ते कशेळी या मार्गा वरील वाहतूक कोंडी व रस्त्याची दुरवस्था झाली होती.
भिवंडी - भिवंडीतील कशेळी काल्हेर ते अंजुर फाटा रस्त्याची सध्या सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागासह एमएमआरडीए प्रशासनाचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भिवंडी ठाणे कशेळी या रस्त्याच्या दोन मर्गिकेच्या दुरस्तीचे काम स्वातंत्र्यरित्या सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीए यांच्या कडे सोपविल्या नंतर ही वर्षभरात हे काम पूर्ण होवू न शकल्याने येत्या पावसाळ्यात या मार्गावरील प्रवास हा पुन्हा खड्ड्यातुन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भिवंडी ते ठाणे दरम्यान बिओटी तत्वावर बनविलेल्या अंजुर फाटा ते कशेळी या मार्गा वरील वाहतूक कोंडी व रस्त्याची दुरवस्था झाली होती.त्यातच मेट्रोच्या कामामुळे देखील या रस्त्याची वाताहात झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेत विरोधात स्थानिक नागरिकांसह अनेक राजकीय पुढार्यांनी अनेक आंदोलने केले. परंतु या रस्त्याचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या कंपनीने रस्ते दुरुस्ती बाबत नेहमीच अनास्था दाखविल्याने शासनाने या रस्त्यावरील टोल वसुली बंद करण्यात आली. त्यानंतर शासनाने या रस्त्याची दुरुस्ती व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीए या दोन विभागांकडे सोपवून वेळेत काम पूर्ण होण्यासाठी दोघांकडे एक एक मर्गिकेचे काँक्रिट करणाचे काम सुरू झाल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
परंतु वर्षभर काम संथ गतीने सुरु असल्याने या रस्त्यावरील अनेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याने,रस्त्या लगतच्या गटरचे काम येत्या मे अखेर पर्यंत हे सर्व काम पूर्ण होणे शक्य नसल्याने येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्यावर पुन्हा पाणी साचून रस्ते खड्डेमय व जलमय होण्याने या मार्गावरून पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा व खड्डेमय रस्त्याचा सामना प्रवाशां सह वाहन चालकांना सोसावा लागणार आहे.