मुंबई महापालिकेच्या काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याची दुरावस्था
By नितीन पंडित | Published: April 10, 2023 06:30 PM2023-04-10T18:30:00+5:302023-04-10T18:30:55+5:30
मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या भिवंडीतील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
भिवंडी- मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या भिवंडीतील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. भिवंडीतील काल्हेर पासून ते ताडाळी पर्यंतच्या पाईपलाईन रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डेमुळे रस्त्यावर लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित म्हात्रे यांनी मुंबई महापालिकेचे उप जल अभियंता श्रीधर चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
काल्हेर ते ताडाली पाईपलाईनच्या रस्त्याचे अक्षरशः वाहत झाली असल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना पाईपलाईन लगतच्या गावातील नागरिकांसह वृद्ध व्यक्तींना तसेच गर्भवती महिला व शालेय विद्यार्थ्यांना याच रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. मात्र रस्त्याची परिस्थिती अत्यंत वाईट झाल्याने नागरिकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी यासंदर्भात गुंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुमित म्हात्रे यांनी मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता चौधरी यांची सोमवारी भेट घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.
उपजल अभियंता चौधरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सदर रस्त्याचे दुरुस्ती काम लवकरात लवकर करण्यात येणार असून मनपा अतिरिक्त आयुक्तांकडे त्या संदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठवण्यात येईल असे आश्वासन उपजल अभियंता चौधरी यांनी सुमित म्हात्रे व शिष्टमंडळास दिले आहे.