भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात

By नितीन पंडित | Published: February 21, 2023 06:56 PM2023-02-21T18:56:30+5:302023-02-21T18:57:05+5:30

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी पालिका कार्यक्रम राबविते.

Bad condition of toilet in Bhiwandi municipal school, in sanctity of MNS movement | भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात

भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात

googlenewsNext

भिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी पालिका कार्यक्रम राबविते.परंतु पालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेली स्वच्छतागृह सुस्थितीत ठेवण्याकडे पालिका प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे .

 पालिकेच्या दगडी शाळा येथील शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शाळा इमारती मध्ये शाळा क्रमांक १ भरविली जाते.या इमरती मध्ये असलेल्या स्वच्छतागृहाची पूर्णतः दुर्दशा झाली आहे.गलिच्छ व तुटके शौचालय ,सडके पत्र्याचे गंजलेले दरवाजे अशा स्वच्छता होत नसलेल्या स्वच्छतागृहाचा वापर येथील विद्यार्थ्यांना नाक मुठीत धरून करावा लागत आहे.

ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शहराध्यक्ष जय नाईक,उपजिल्हा अध्यक्ष योगेश धुळे,जिल्हा सचिव हर्शल भोईर,विभाग अध्यक्ष कुणाल अहिरे,कायदेशीर सल्लागार अँड सुनिल देवरे या शिष्टमंडळासह पालिका शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासना अधिकारी थोरात यांची भेट घेऊन निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. येत्या आठ दिवसात या स्वच्छता गृहांची दुरुस्ती व स्वच्छता न झाल्यास विद्यार्थ्यांना पालिका मुख्यालयाच्या दालनात स्वच्छतागृहा साठी घेऊन येऊ असा इशारा परेश चौधरी यांनी निवेदन देऊन दिला आहे .

Web Title: Bad condition of toilet in Bhiwandi municipal school, in sanctity of MNS movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे