बदलापूरच्या आदिवासीने शोधले शेतीसाठी बिनविजेचे यंत्र

By Admin | Published: January 1, 2017 03:45 AM2017-01-01T03:45:48+5:302017-01-01T03:45:48+5:30

अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. यावर बदलापूरजवळील चोण

Badavijay Devan for agricultural land discovered by the tribals of Badlapur | बदलापूरच्या आदिवासीने शोधले शेतीसाठी बिनविजेचे यंत्र

बदलापूरच्या आदिवासीने शोधले शेतीसाठी बिनविजेचे यंत्र

googlenewsNext

- पंकज पाटील, बदलापूर
अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. यावर बदलापूरजवळील चोण गावात राहणाऱ्या रामचंद्र खोडका या आदिवासी समाजातील व्यक्तीने या समस्येवर उपाय शोधला आहे. जुजबी यांत्रिक कौशल्याच्या बळावर पाण्याच्याच प्रवाहाचा वापर करून विनाइंधन पाणी उपसा करणारे यंत्र त्यांनी तयार केले आहे. त्यातून ते शेतीला पाणी पुरवतात, पण लवकरच त्यावर वीजनिर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या चोण गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीच्या प्रवाहात त्यांनी हे यंत्र बसविले असून त्याद्वारे कोणतेही इंधन न वापरता पाणी उपसले जात आहे. या यंत्राच्या पेटंटसाठीही त्यांनी अर्ज केला आहे.
आयटीआयमधून वेल्डरचा पदविका अभ्यासक्र म पूर्ण केलेल्या खोडका यांनी काही काळ स्वत:चे वर्कशॉप टाकून व्यवसाय केला. नंतर राज्य परिवहनच्या कर्जत आगरात तांत्रिक कारागिर म्हणून त्यांची नेमणूक झाली. नोकरीबरोबरच चोण गावात ते शेतीही करतात. गावालगत नदी असूनही विजेअभावी त्यांना शेतीसाठी पाणी उपसून आणता येत नव्हते. डिझेलवर मोटर चालविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे कोणत्याही इंधनाचा वापर न करता नदीतले पाणी उपसून आणता येईल का, याचा विचार ते करू लागले.
धरणामुळे बारवी नदी बारमाही वाहती आहे. प्रवाहाच्या शक्तीमुळे नदीपात्रात त्यांनी बसविलेला चार पात्याचा लोखंडी पंखा फिरतो आणि पाणी उपसले जाते. या प्रक्रि येत कुठेही वीज, डिझेल अथवा अन्य कोणतेही इंधन वापरले जात नाही. उलट उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे वीजनिर्मिती करणेही शक्य होते. दीड वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. विनाइंधन पाणी उपसा करणारे हे यंत्र बनविण्यासाठी त्यांना ६० हजारांचा खर्च आला. मात्र हा खर्च त्यांच्यासाठी कायमस्वरुपी झाला आहे. पाण्याविना शेत राहत नसल्याने बारमाही शेतीचा मार्ग त्यांनी मोकळा केला आहे. स्वत:चे कौशल्य वापरुन त्यांनी ही किमया साध्य केली आहे. आता या यंत्रात अजून काही सुधारणा करणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू आहे.

‘‘साधारण पावसाळ्यानंतर शेतीत कोणतेही पीक घ्यायचे म्हटले, तर नदीतून पाणी उपसा करण्यासाठी वीज अथवा डिझेलचा खर्च करावा लागतो. या यंत्राने तो खर्च पूर्णपणे वाचेल. शिवाय काही प्रमाणात वीजनिर्मिती होईल. या यंत्राची फारशी देखभाल करावी लागणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त आहे.
- रामचंद्र खोडका, चोण

Web Title: Badavijay Devan for agricultural land discovered by the tribals of Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.