बदलापूरकरांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:25 AM2017-08-07T06:25:56+5:302017-08-07T06:25:56+5:30
बदलापूरमधील वीजग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ग्राहक मेळाव्यात संताप व्यक्त करण्यात आला. ग्राहकांच्या तक्रारी पाहून आलेले अधिकारीही संभ्रमात पडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापूरमधील वीजग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ग्राहक मेळाव्यात संताप व्यक्त करण्यात आला. ग्राहकांच्या तक्रारी पाहून आलेले अधिकारीही संभ्रमात पडले होते. बदलापूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि संताप व्यक्त होत असेल, तर येथील महावितरणची यंत्रणा ही अपुरी असल्याची कबुली अधिकाºयांनी दिली. त्यात काय सुधारणा करणार, हे आश्वासन देत अधिकाºयांनी मेळाव्याची सांगता केली.
बदलापूरमधील अजय राजा हॉलमध्ये रविवारी झालेल्या मेळाव्याला महावितरणचे विभागीय मुख्य अभियंता आर.डी. मुंढे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अनेक प्रश्न ग्राहकांनी मांडले. वीजबिलावरील समस्यांवर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. तर, दुसरीकडे नियमित वीज खंडित होण्याच्या प्रकारावर संताप व्यक्त करण्यात आला. सोबत, या मेळाव्यात ग्राहकांनी वेळेवर बिल न येणे, अव्वाच्यासव्वा बिल येणे, वीजबिलावरील रीडिंग न दिसणे, बिलावर मीटरचा फोटो नसणे, कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित नसणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, वीजपुरवठा खंडित झाल्याबाबत माहिती न मिळणे आदी तक्र ारींचा पाढा वाचला. त्याचप्रमाणे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाºयांना ग्राहकांशी सौजन्याने वागण्याचे धडे देण्याची मागणी केली. ग्राहकांच्या या तक्र ारी ऐकल्यानंतर महावितरणच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुंढे यांनी दिले.
संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण आउट सोर्सिंग एजन्सीच्या माध्यमातून रीडिंग घेत असून यासंदर्भातील तक्र ारी दूर करण्यासाठी दोन महिन्यांपासून कार्यवाही सुरू आहे. त्यामध्ये रीडिंगमध्ये तफावत आढळल्यास तसेच ग्राहकांना वेळेवर बिल न मिळाल्यास संबंधित एजन्सीवर कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी सांगितले. वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी वीज सबस्टेशनची कामे वेगाने सुरू असून लवकरच त्यांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या महावितरणकडे मोठ्या प्रमाणात मीटर उपलब्ध असून ग्राहकांना मीटर नादुरु स्त असल्यास वा नवीन कनेक्शन हवे असल्यास देणे शक्य आहे. त्यामुळे महावितरणच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचाºयांनी मीटर उपलब्ध नसल्याचे ग्राहकांना सांगू नये, असे त्यांनी बजावले. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास वा तत्सम प्रसंगी फोन न उचलणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. वीजग्राहकांच्या सोयीसाठी आणखी वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांनी आॅनलाइन बिल भरणा सुविधेचाही फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरमध्ये वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी उपकेंद्राची प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी उपनगराध्यक्ष शरद तेली, भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे, शहराध्यक्ष संभाजी शिंदे, नगरसेवक किरण भोईर, संजय भोईर, अविनाश भोपी, प्रशांंत कुलकर्णी यांच्यासह महावितरणचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाइलवर मिळणार संदेश
वीजग्राहकांनी त्यांचे मोबाइल नंबर वीजबिलाला जोडल्यास त्यांना त्यांच्या बिलाची, रीडिंगची माहिती बिल येण्यापूर्वीच मिळेल. त्यामुळे त्यात काही चूक झाल्यास तशी तक्र ार ग्राहक करू शकतील. त्याशिवाय, थकीत बिलाची माहिती मिळून ते बिल भरणे ग्राहकांना शक्य होईल. त्याचप्रमाणे काही कामानिमित्त वीजपुरवठा खंडित होणार असल्यास त्याची माहितीही मिळू शकेल, असे मुंढे यांनी सांगितले.