Badlapur: बदलापूर मध्ये ९० किलो गांजा जप्त; सुसंस्कृत बदलापूरमध्ये गांजा तस्करीमुळे खळबळ

By पंकज पाटील | Published: August 26, 2023 06:07 PM2023-08-26T18:07:43+5:302023-08-26T18:08:56+5:30

Badlapur: बदलापूरमध्ये आमला पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढ होत असून परराज्यातून तब्बल 32 लाखांच्या 90 किलो गांजासह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Badlapur: 90 kg ganja seized in Badlapur; Cultivated Badlapur blamed for ganja smuggling | Badlapur: बदलापूर मध्ये ९० किलो गांजा जप्त; सुसंस्कृत बदलापूरमध्ये गांजा तस्करीमुळे खळबळ

Badlapur: बदलापूर मध्ये ९० किलो गांजा जप्त; सुसंस्कृत बदलापूरमध्ये गांजा तस्करीमुळे खळबळ

googlenewsNext

- पंकज पाटील
बदलापूर - बदलापूरमध्ये आमला पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढ होत असून परराज्यातून तब्बल 32 लाखांच्या 90 किलो गांजासह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही आरोपी एका खाजगी कारमधून गांजा नेत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या आधी देखील बदलापुरातून चार चाकी कारमध्ये गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला होता.

आता सलग दुसऱ्यांदा कारवाई करून तब्बल 32 लाखांचा गांजा जप्त केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जाणार कुठे होता याचा पोलीस तपास करीत आहे. गांजाची तस्करी करणाऱ्यांसोबत बदलापूरच्या आरोपींचे हितसंबंध कुठे जोडले गेले आहेत याचा देखील तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान बदलापूर सारख्या सुसंस्कृत अमली पदार्थाच्या तस्करीचे प्रकार वाढत असल्यामुळे ही बाब चिंतेची मांडली जात आहे. बदलापूरच नव्हे तर अंबरनाथ उल्हासनगर आणि भिवंडी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री केली जात आहे त्या विक्रेत्यांनाच हा गांजा पुरवला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 

Web Title: Badlapur: 90 kg ganja seized in Badlapur; Cultivated Badlapur blamed for ganja smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.