चिमुकलींसाठी आक्रोश; बदलापुरात उद्रेक, रेल्वे वाहतूक दिवसभर ठप्प
By पंकज पाटील | Published: August 21, 2024 05:48 AM2024-08-21T05:48:03+5:302024-08-21T07:20:50+5:30
Badlapur Assault Case : बदलापूरकरांनी सर्व राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांना बाजूला सारून मंगळवारी 'बदलापूर बंदची हाक दिली.
- पंकज पाटील
बदलापूर (जि. ठाणे) : येथील आदर्श विद्यालय या नागांकित शाळेत शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेवरून मंगळवारी बदलापुरात नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाला. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी पहाटे ६ वाजता सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण बदलापूररेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले. संतप्त जमावाने रेल्वेमार्गातर ठिय्या दिला, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प होती. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तर आंदोलकांनी दगडफेकीने प्रत्युत्तर दिले.
या धुमश्चक्रीत ४ पोलिस व १२ आंदोलक जखमी झाले. मंत्री गिरीश महाजन यांच्यापासून आमदार किसन कथोरे यांच्यापर्यंत व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यापासून लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसते यांच्यापर्यंत अनेकांनी मागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र, जमाव 'फाशी.. फाशी' अशी मागणी करीत होता, पोलिसांनी लाठीमाराचा प्रयत्न केला असता.
काहींनी दगडांचा मारा केला, सायंकाळी ६ वाजता फौजफाटा व रेल्वे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली. पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगविले. स्टेशनबाहेरील पोलिस गाड्यांची तोडफोड करणाऱ्या २५ ते ३० जणांना ताब्यात घेतले. तसेच रेल्वेस्थानकात आंदोलन करणाऱ्या ८ महिलांसह २६ जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. तब्बल ३०० अनोळखी व्यक्तीतर गुन्हे दाखल करण्यात आले.
सोशल मीडियाद्वारे एकवटले लोक
बदलापूरकरांनी सर्व राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांना बाजूला सारून मंगळवारी 'बदलापूर बंदची हाक दिली. सोशल मीडियावर याबाबतचे संदेश व्हायरल झाले. आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली. किमान चार ते पाच हजार नागरिक जमा झाले. त्यात बहुतांश तरुण-तरुणी होते. सकाळी दहाच्या सुमारास काही नागरिकांनी शाळेचे मुख्य प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला आणि शाळेतील वर्गाची व अन्य मालमत्तेची तोहपीड सुरु केली. यावेळी पोलिसानी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने शाळेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.
मंत्र्यांसमोर फाशी-फाशीच्या घोषणा
आंदोलकांशी चर्चा करण्याकरिता मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलिस आयुक आशुतोष डुब्बरे यांनीही धाव घेतली. मात्र, त्यांनाही फारसे यश आले नाही. मंत्री बोलत असताना फाशी. फाशी.. अशा घोषणा दिल्या जात होत्या. अत्याचाराचे खटले फास्ट ट्राकवर चालविण्याचे आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल, याचे आश्वासन महाजन व शिनगारे देत होते. मात्र, आंदोलक जस्टिस जस्टिस... अशा घोषणा देत होते.
असे काय झाले की एवढा जनक्षोभ उसळला?
बदलापुरातील आदर्श महाविद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर साहेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने ११ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलीच्या आईला पोलिस ठाण्याच्या परिसरारात १२ तास उभे करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले.
आठ तास रेल रोको
शाळेत तोडफोड केल्यानंतर काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला, दहा वाजता बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे वाहतूक आंदोलकांनी रोखली. परिणामी, अंबरनाथ स्थानकापुढील कर्जत, खोपोलीकडील रेल्वे वाहतूक वाम झाली. एकीकडे शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु होते, तर दुसरीकडे रेल रोको सुरू झाल्यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदोलकांशी चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतरही आंदोलन मागे घेतले जात नसल्याने पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास लाठीमार केला. यावेळीआंदोलकांनी पोलिसांवर दगड भिरकावले.
२६ जणांना अटक
बदलापूर रेल्वेस्थानकात आंदोलन करणाऱ्या २६ जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यात आत महिलांचा समावेश आहे. तसेच ३०० अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांची ओळख पटवण्यात येत असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलिस वाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
५० लोकल फेऱ्याही केल्या रद्द, २४ मेल-एक्स्प्रेस वळविल्या
बदलापूर ते कर्जत-खोपोली अपडाऊन मार्गावरील ५० हुन अधिक लोकल रद्द करण्यात आल्या. तर २४ मेल-एक्सप्रेस ठाणे, दिवा, पनवेल मार्गे वळविल्या. मंगळवारी सकाळी ९:३० पासून सर्व गाड्या खोळंबल्या, संध्या. ५ वाजेपर्यंत १२ मेल/ एक्सप्रेस वळविल्या. कल्याण ते कर्जतदरम्यान ५५ बस चालविण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. कोयना एक्स्प्रेस बदलापूर ते कल्याण व नंतर दिवा-पनवेल मार्गे कर्जतकडे पाठविली.
संकटमोचक महाजन
सरकारचे प्रतिनिधी म्हणून नेहमीच संकटमोचकाची भूमिका निभारणारे मंत्री गिरीश महाजन यांनाच बदलापूरमध्येही पाडण्यात आले. गिरीश महाजन यांनी तब्बल ताराभर चर्चा केली, हे आंदोलकांना वारंवार शांत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आंदोलक ऐकत नव्हते. सरकारने या आंदोलनानंतर बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेबाबत कोणते निर्णय घेतले आहे, याची इत्यंभूत माहिती त्यांनी दिली. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वातावरण शांत झाले. मात्र, आंदोलन मागे घेण्यास आंदोलक तयार झाले नाहीत.