त्या शाळेचे संचालक मंडळ केले बरखास्त; शाळेवर प्रशासकाची नेमणूक
By पंकज पाटील | Updated: August 23, 2024 19:59 IST2024-08-23T19:56:59+5:302024-08-23T19:59:25+5:30
चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा लक्षात घेऊन शासनाने तात्काळ संचालक मंडळ बरखास्त केले आहे.

त्या शाळेचे संचालक मंडळ केले बरखास्त; शाळेवर प्रशासकाची नेमणूक
बदलापूर: अत्याचाराची घटना घडलेल्या त्या शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे. चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा लक्षात घेऊन शासनाने तात्काळ संचालक मंडळ बरखास्त केले आहे.
शाळेचे कामकाज चालवण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी सल्लागार म्हणून अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर आणि नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाने नेमलेल्या प्रशासकांनी पदभार स्वीकारला असून शाळेतील पोलिसांचा सुरू असलेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शाळेचे कामकाज आणि वर्ग नियमित सुरू करण्यासाठी देखील त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.