Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; उपचारासाठी रुग्णालयात गेली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:12 IST2025-04-05T19:09:16+5:302025-04-05T19:12:43+5:30
बदलापुरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. कॅन्सर झालेल्या एका १३ वर्षाच्या मुलीवर ओळखीमधील व्यक्तीनेच अनेक वेळा अत्याचार केला. या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरले.

Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; उपचारासाठी रुग्णालयात गेली अन्...
Badlapur Crime news: कॅन्सरशी झुंज देत असलेल्या एका १३ वर्षाच्या मुलीला ओळखीतल्याच व्यक्तीने वासनेची शिकार केलं. पीडितेने आणि कुटुंबीयांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यानेच माणुसकीच्या नात्याला काळीमा फासला. काही महिन्यांपूर्वी राज्यभरात चर्चिल्या गेलेल्या बदलापूरमध्ये. पीडित मुलगी मूळची बिहारची असून, कॅन्सरच्या उपचारासाठी ती मुंबईत आली होती. जेव्हा तरुणीवर केमोथेरपी सुरू झाली. चाचण्यादरम्यान, ती गर्भवती असल्याचे निप्षन्न झालं आणि अत्याचाराचे हे प्रकरण समोर आलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलीला कॅन्सर झाल्याचे निदान तपासण्यादरम्यान झाले. कॅन्सरवरील उपचारासाठी पीडितेच्या कुटुंबाला मुंबईत उपचार घेण्याचा सल्ला दिला गेला. त्यांना तिला घेऊन मुंबईला यायचं होतं. त्यांचं ओळखीतल्या २७ वर्षीय सूरज सिंह याच्यासोबत बोलणं झालं. त्यानं बदलापूरमध्ये भाड्याने रूम घेऊन दिली.
वाचा >>स्पा सेंटरमध्ये शिरुन विवाहित प्रेयसीची केली हत्या, मृतदेहासमोर बसून ढसाढसा रडला अन्...
मुलीला घेऊन कुटुंबीय बदलापूरमध्ये आले. भाड्याच्या घरात राहू लागले. त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने तो त्यांच्या घरी येत-जात असे. पण, याच काळात त्याने अनेकदा कॅन्सर पीडित मुलीवर अत्याचार केले.
...अन् बलात्काराच्या प्रकरणाला फुटली वाचा
दरम्यान, कुटुबीय मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. केमोथेरपी दरम्यान, मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर सूरज सिंह याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचे समोर आले.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.