बदलापूर : पूर्वेकडील MIDC परिसरात केमिकल प्रकल्पात वायूगळती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 11:35 PM2021-06-03T23:35:20+5:302021-06-03T23:37:51+5:30

प्रशासनाची घटनास्थळी धाव. वायुगळतीचे कॉक करण्यात आले बंद.

Badlapur gas leak at a chemical plant in the eastern MIDC area | बदलापूर : पूर्वेकडील MIDC परिसरात केमिकल प्रकल्पात वायूगळती

बदलापूर : पूर्वेकडील MIDC परिसरात केमिकल प्रकल्पात वायूगळती

Next
ठळक मुद्देप्रशासनाची घटनास्थळी धाव. वायुगळतीचे कॉक करण्यात आले बंद.

बदलापूर : येथील पूर्वेकडील MIDC भागातील एका केमिकल प्लांट मध्ये वायू गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून सदर कंपनीमध्ये जाऊन वायू गळतीचे कॉक बंद कले आहे. सध्या प्रशासनाकडून कंपनीची पाहणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
 
रात्री १०.३० वाजताच्या सुमारास शिरगाव एम. आय.डी.सी., आपटेवाडी, बदलापूर  येथे मे. नोबेल इंटरमीडिएट्स प्रा.ली. या कंपनीमध्ये ओव्हरहिटमुळे सल्फुरिक अॅसिड व बेंझिल्स अॅसिडमध्ये केमिकल रिअॅक्शन होऊन गॅस गळती झाली होती. त्यामुळे ३ किलोमीटरच्या परिसरातील लोकांना श्वास घेण्यास व डोळे चुरचुरण्याचा त्रास होत होता. सदर घटनास्थळी बदलापूर आणि अंबरनाथ अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून गँस गळती थांबविण्यात आली असून रात्री ११.३० च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.



सदर घटनेत कोणताची अनुचित प्रकार घडला नाही. मात्र गॅस गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

Web Title: Badlapur gas leak at a chemical plant in the eastern MIDC area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.