बदलापूर पालिकेला ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:28 AM2017-08-05T02:28:25+5:302017-08-05T02:28:25+5:30
बदलापूर पालिका अधिका-यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास चालढकल केल्याप्रकरणी पालिकेला दंड ठोठावला आहे. माहिती देण्यास नकार देणा-या अधिका-याला हा दंड केला आहे.
बदलापूर : बदलापूर पालिका अधिका-यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास चालढकल केल्याप्रकरणी पालिकेला दंड ठोठावला आहे. माहिती देण्यास नकार देणा-या अधिका-याला हा दंड केला आहे.
बदलापूर पालिकेच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अधिकाºयांची हजेरीबाबतची माहिती वैयक्तिक ठरवण्याचा प्रताप नगरपालिकेने केला आहे. त्यामुळे कोकण खंडपीठाच्या माहिती आयुक्तालयाने दंड ठोठावला आहे. नगरपालिकेतील अधिकाºयांच्या हजेरीबाबत माहितीसंबंधी दिनेश नेरकर यांनी प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र, पालिकेत येणाºया अधिकाºयांची हजेरी त्यांची वैयक्तिक बाब असून ती माहिती देता येऊ शकत नाही, असे सांगत त्यांना माहिती नाकारण्यात आली होती. त्यांना माहिती न मिळाल्याने नेरकर यांनी अपील केले होते. मात्र, त्यावरही योग्य वेळेत सुनावणी घेतली नव्हती. याप्रकरणी १३ जुलैला दिलेल्या आदेशात बदलापूर नगरपालिकेच्या आस्थापना विभागातील अधिकाºयांनी नेरकर यांना माहिती न दिल्याबद्दल दंडाची शिक्षा सुनावली. त्यानुसार, त्यांच्यावर १ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.
राज्य माहिती आयुक्तालयाच्या कोकण खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या दंडाची वसुली आस्थापना प्रमुखांच्या वेतनातून ४ मासिक हप्त्यांतून करून सरकारकडे जमा केली जाणार आहे. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल आयोगास सादर करावा, असेही आदेश राज्य माहिती आयुक्तालयाच्या कोकण खंडपीठाने दिले आहे.