बदलापूर पालिकेने अंबरनाथ एमआयडीसीत उभारले 2 लाख लीटर क्षमतेचे ऑक्सिजन स्टोरेज प्लांट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 07:21 PM2021-04-15T19:21:48+5:302021-04-15T19:22:07+5:30

बदलापूर शहराला सध्या दिवसाला ८ हजार लिटर ऑक्सिजन लागत असून यापैकी ६ हजार लिटर ऑक्सिजन पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये, तर दोन हजार लिटर ऑक्सिजन खाजगी रुग्णालयांमध्ये वापरला जातो. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे मागील आठवड्यात दोन वेळा बदलापूरमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती.

Badlapur Municipal Corporation will store 2 lakhs liter Oxygen | बदलापूर पालिकेने अंबरनाथ एमआयडीसीत उभारले 2 लाख लीटर क्षमतेचे ऑक्सिजन स्टोरेज प्लांट

बदलापूर पालिकेने अंबरनाथ एमआयडीसीत उभारले 2 लाख लीटर क्षमतेचे ऑक्सिजन स्टोरेज प्लांट

Next

बदलापूर : बदलापूर शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुतांशी रुग्णांना ऑक्सीजन लागत असल्याने बदलापूरमध्ये मागील आठवडाभरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र यावर बदलापूर पालिकेनं कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. ऑक्सीजन चा साठा करण्यासाठी स्टोरेज प्लांट उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बदलापूर पालिकेला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने हैदराबादमधील एका कंपनीच्या सहाय्याने अंबरनाथ एमआयडीसीमध्ये ऑक्सिजन स्टोरेज उभारले असून तिथे जवळपास २ लाख लिटर ऑक्‍सिजनचा साठा करता येणार आहे.

बदलापूर शहराला सध्या दिवसाला ८ हजार लिटर ऑक्सिजन लागत असून यापैकी ६ हजार लिटर ऑक्सिजन पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये, तर दोन हजार लिटर ऑक्सिजन खाजगी रुग्णालयांमध्ये वापरला जातो. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे मागील आठवड्यात दोन वेळा बदलापूरमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र यावर उपाय म्हणून बदलापूर पालिकेला ऑक्सिजनचा पुरवठा करणारे ठेकेदार भरत नवगिरे यांनी हैदराबादच्या एका कंपनीसोबत मिळून अंबरनाथ एमआयडीसीमध्ये ऑक्सिजनचा प्लँट उभारला असून तिथे तब्बल २ लाख लिटर ऑक्सीजनचा साठा करता येणार आहे.

या प्लँटची आज उल्हासनगरचे प्रांत अधिकारी जयराज कारभारी आणि बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी पाहणी केली. शहराला दिवसाला ८ हजार लिटर ऑक्सिजन लागत असला, तरी भविष्यात ही मागणी वाढण्याची शक्यता असून त्यादृष्टीने बदलापूर पालिकेकडे २ लाख लिटर ऑक्‍सिजनचा साठा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे यापुढे बदलापूर पालिकेला कधीही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असा विश्‍वास यावेळी प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी व्यक्त केला. तसेच बदलापूर शहरातील रुग्णांना रेमडीसिविर इंजेक्शन मिळवण्यात अडचणी येत असून त्यादृष्टीनेही शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी दिली. त्यामुळे बदलापूर शहरात आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविर यांची कमतरता भासणार नसून रुग्णांवर अधिक चांगले उपचार करता येणार आहेत. 

Web Title: Badlapur Municipal Corporation will store 2 lakhs liter Oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.