बदलापूर नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा, निवडणूक घेण्यास आयोगाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:25 AM2019-03-22T03:25:30+5:302019-03-22T03:25:44+5:30

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन २० दिवस उलटले, तरी अजूनही या पदासाठी निवडणूक जाहीर झालेली नाही.

Badlapur Municipal Council cleared the way for election, the Commission's approval to take the election | बदलापूर नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा, निवडणूक घेण्यास आयोगाची मंजुरी

बदलापूर नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा, निवडणूक घेण्यास आयोगाची मंजुरी

googlenewsNext

बदलापूर - कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन २० दिवस उलटले, तरी अजूनही या पदासाठी निवडणूक जाहीर झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात अभिप्राय मागवल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. अभिप्रायामध्ये निवडणूक आयोगाने नियमानुसार निवडणूक घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आठवडाभरात नगराध्यक्षपदाची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बदलापूरच्या नगराध्यक्ष विजया राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक घेणे गरजेचे होते.जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात अधिकार असल्याने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता होती. मात्र, जिल्हाधिका-यांनी या निवडणुकीसंदर्भात उल्हासनगर उपविभागीय अधिकाºयांवर जबाबदारी सोपवत त्यांना निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले होते.

मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक लागण्याआधीच लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागल्याने पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे.
आचारसंहितेच्या काळात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. निवडणूक आयोगाने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आचारसंहितेचा अडथळा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नियमानुसार जिल्हाधिकाºयांना निवडणुका घेण्याचे अधिकार
दिले.

त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आचारसंहितेची कोणतीच अडचण राहिलेली नाही. त्यामुळे येत्या आठवडाभरात ही निवडणूक जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याचिकेवर निर्णय अवलंबून नाही
२७ किंवा २८ मार्चला ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आचारसंहितेचा अडथळाच दूर झाल्याने आता उच्च न्यायालयातील याचिकेवर कोणताच निर्णय अवलंबून नसल्याचे दिसत आहे.
 

Web Title: Badlapur Municipal Council cleared the way for election, the Commission's approval to take the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.