बदलापूर पालिका : उपनगराध्यक्षांनी दिला राजीनामा, सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:01 AM2019-02-06T03:01:07+5:302019-02-06T03:02:53+5:30

कुळगाव-बदलापूर नगराध्यक्षपदाचा सव्वावर्षाचा कालावधी संपल्याने नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाबतंत्राचा वापर सुरू झाला आहे.

Badlapur municipality: resignation by suburban resident, internal dispute between the army | बदलापूर पालिका : उपनगराध्यक्षांनी दिला राजीनामा, सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

बदलापूर पालिका : उपनगराध्यक्षांनी दिला राजीनामा, सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

googlenewsNext

बदलापूर - कुळगाव-बदलापूर नगराध्यक्षपदाचा सव्वावर्षाचा कालावधी संपल्याने नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाबतंत्राचा वापर सुरू झाला आहे. अडीच वर्षातील कार्यकाळ शिवसेनेतील दोन गटांमध्ये विभागून देण्याबाबत पालकमंत्र्यांकडे चर्चा झाली होती. त्यानुसार नगराध्यक्षांना राजीनाम्याची आठवण करुन देण्यासाठी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुनील भगत यांनी मंगळवारी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले असले तरी नगराध्यक्षांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठीच ही खेळी शिवसेनेने खेळली असल्याचे बोलले जात आहे.

नोव्हेंबर २०१७ मध्ये शिवसेनेने अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची चाचपणी केली होती. त्यात मोहन राऊत यांच्या पत्नी विजया यांना नगराध्यक्षपद मिळावे यासाठी शिवसेनेच्या एका गटाने पाठपुरावा केला होता. तर शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या गटामार्फत अ‍ॅड. प्रियेश जाधव यांना नगराध्यक्षपद मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू होता. या दोन गटातील संघर्षामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही गटांची समजूत काढत नगराध्यक्षपद विभागून देण्याबाबत विचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार विजया राऊत यांना सव्वा वर्ष नगराध्यक्षपद देण्यात आले. तर उर्वरित शेवटचे सव्वा वर्ष शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यावर एकमत झाले. त्यानुसार राऊत यांनी आपला सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असून आता त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिवसेनेच्या दुसºयाने गटाने मोर्चेबांधणी केली आहे. नगराध्यक्ष पदासोबत उपनगराध्यक्षपदही विभागून देण्यात आले होते. आता नगराध्यक्षांना राजीनाम्याची आठवण करुन देण्यासाठी उपनगराध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.

उपनगराध्यक्ष भगत यांनी पदाचा राजीनामा देताना वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. मात्र हा राजीनामा वैयक्तिक आहे की दबावतंत्र आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र भगत यांचा राजीनामा हा नगराध्यक्षांना राजीनाम्याची आठवण करुन देण्यासाठी दिल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे बदलापूरच्या नगराध्यक्ष पदाबाबत संभ्रम असला तरी सव्वा वर्षानंतर नगराध्यक्षांना राजीनामा देऊन दुसºया नगरसेवकाला या पदासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांना अजूनही राजीनाम्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पालकमंत्री काय आणि केव्हा आदेश देणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. तर दुसरीकडे राऊत यांनी नगराध्यक्षपदाबाबत बोलतांना पालकमंत्र्यांकडून जो आदेश येईल त्या आदेशाचे पालन केले जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाचा विषय हा पालकमंंत्र्यांच्या दरबारात सुटणार हे स्पष्ट झाले आहे.

आदेशाचे पालन

या संदर्भात शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही राजीनाम्याबाबत आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच काम केले जाईल. जो आदेश येणार त्याचे पालन करण्याची जबाबदारी आपण सांभाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालकमंत्री कुठला आदेश देतात याकडे येथील स्थानिक शिवसेना पदाधिकाºयांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: Badlapur municipality: resignation by suburban resident, internal dispute between the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.