बदलापूर नगरपालिकेमार्फत कोरोना रुग्णांना मोफत उपचारासाठी यंत्रणा उभारणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 05:25 PM2020-07-18T17:25:35+5:302020-07-18T17:26:12+5:30

प्रशासन गिरासे यांनी यासाठी नगरपालिकेने काही खाजगी मंगल कार्यालय ताब्यात घेतले असून याठिकाणी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे.

Badlapur Municipality will set up a system for free treatment of Corona patients | बदलापूर नगरपालिकेमार्फत कोरोना रुग्णांना मोफत उपचारासाठी यंत्रणा उभारणार 

बदलापूर नगरपालिकेमार्फत कोरोना रुग्णांना मोफत उपचारासाठी यंत्रणा उभारणार 

googlenewsNext

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील कोरणा पॉझिटिव रुग्णांसाठी यंत्रणा उभी करण्याचे आश्वासन कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचा प्रशासन आणि उल्हासनगर चे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिले. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या सभागृहात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख वामन म्हात्रे, भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे, नगरसेवक संभाजी शिंदे, शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांनी शहरातील कोरोना रुग्णांवर मोफत उपचार सुरू व्हावेत अशी आग्रही मागणी केली.

यावर प्रशासन गिरासे यांनी यासाठी नगरपालिकेने काही खाजगी मंगल कार्यालय ताब्यात घेतले असून याठिकाणी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच विविध संस्था आणि डॉक्टर यांच्या माध्यमातून लवकरच शहरातील रुग्णांना या ठिकाणी मोफत उपचार सुरू करण्यात येतील अशी माहिती गिरासे यांनी दिली.  कुळगाव बदलापूर नगर पालिका हद्दीत सध्या तीन ते चार हॉस्पिटलला हे कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करत आहेत. तसेच एक हॉस्पिटल हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत असून तेथे व्हेंटिलेटरची सुविधा आहे. मात्र यापुढील काळात शहरातील ज्या  हॉस्पिटलला कोरोना रुग्णांची  उपचार करायचे आहे त्यांनी स्वतःहून हॉस्पिटल जाहीर करावे असेही गिरासे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता हॉस्पिटल प्रशासनाला नसल्याचेही गिरासे यांनी सांगितले. तसेच कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने सोनिवली येथे उभारलेल्या सेंटरमध्ये यापुढे रुग्णांना त्रास येऊ नये म्हणून तेथे जेवणासाठी विभागून ठेकेदार नेमून जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच लहान-मोठ्या गोष्टीही तातडीने पुरवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे गिरासे यांनी सांगितले.  
     

''बदलापुरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात ऑक्सिजनची यंत्रणा उभारण्यात येणार आहे त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजन अभावी इतर रूग्णालयात लावण्याची वेळ येत होती ही गैरसोय आता टळणार आहे.
-  दीपक पुजारी, मुख्याधिकारी,

Web Title: Badlapur Municipality will set up a system for free treatment of Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.