शरद पवार गटात गेलेल्या बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना धमकी
By पंकज पाटील | Updated: August 19, 2023 18:18 IST2023-08-19T18:18:15+5:302023-08-19T18:18:47+5:30
काही दिवसांपूर्वीच शैलेश वडनेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष पद मिळाले.

शरद पवार गटात गेलेल्या बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना धमकी
पंकज पाटील
अंबरनाथ : नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात सामील झालेले बदलापूरचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांना धमकी देण्यात आली आहे. व्हाट्सअप्पच्या माध्यमातून धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आली. याविरोधात वडनेरे यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता पोलिसांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वीच शैलेश वडनेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष पद मिळाले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून वडनेरे हे राजकारणापासून अलिप्त होते. त्यांनी आपल्या उद्योग क्षेत्राकडेच लक्ष केंद्रित केले होते. शिवसेनेत असताना त्यांचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्याबरोबर पटत नसल्यामुळे त्यांनी राजकारणातून काहीसा दुरावा निर्माण केला होता. त्यानंतर वडनेरे हे राष्ट्रवादी सामील झाले होते. मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार गटाचे नेतृत्व स्वीकारत शहराध्यक्ष पद मिळवले होते.