बदलापूरच्या गगनगिरी केमिकल कंपनीला भीषण आग

By पंकज पाटील | Published: February 12, 2023 03:12 PM2023-02-12T15:12:34+5:302023-02-12T15:13:01+5:30

Thane News: बदलापूर एमआयडीसीमध्ये गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीला आज दुपारी 1.45 मिनिटांनी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहे.

Badlapur's Gagangiri Chemical Company caught fire | बदलापूरच्या गगनगिरी केमिकल कंपनीला भीषण आग

बदलापूरच्या गगनगिरी केमिकल कंपनीला भीषण आग

googlenewsNext

- पंकज पाटील
बदलापूर - बदलापूर एमआयडीसीमध्ये गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीला आज दुपारी 1.45 मिनिटांनी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना ही आग लागल्याने काही कामगार जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 बदलापूर एमआयडीसी परिसरात अग्निशामक केंद्राच्या समोरच गगनगिरी फार्मा केमिकल नावाची कंपनी असून या कंपनीमध्ये विविध प्रकारचे फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारे केमिकल तयार करण्याचे काम केले जात होते. आज दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी अचानक या कंपनीमध्ये आग लागली. आगीचे कारण कळू शकले नसले तरी क्षणार्धात या आगीने रौद्ररूप धारण केले होते. बदलापूर पालिकेची अग्निशमन यंत्रणा समोरच असल्याने बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यामुळे ही आग क्षणार्धात वाढली आणि संपूर्ण कंपनी या आगीच्या विळख्यात सापडली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कामगारांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

या आगीच्या घटनेत दोन कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्वलनशील केमिकल मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशामक दलाचे जवान पाणी आणि फोमचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.  बदलापूर, अंबरनाथ एमआयडीसी, अंबरनाथ पालिका, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि तळोजा एमआयडीसी मधील अग्निशामक दलाच्या गाड्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Badlapur's Gagangiri Chemical Company caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.