बॅडमिंटनच्या खेलो इंडियाचे मुंबई विभागात एकमेव प्रशिक्षण केंद्र ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 06:52 PM2022-03-27T18:52:03+5:302022-03-27T18:52:38+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्धाटन, बॅडमिंटनचे हे आजपासून आज सुरू झालेले प्रशिक्षण केंद्र राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र आहे

Badminton's Khelo India's training center in Mumbai division at Thane | बॅडमिंटनच्या खेलो इंडियाचे मुंबई विभागात एकमेव प्रशिक्षण केंद्र ठाण्यात

बॅडमिंटनच्या खेलो इंडियाचे मुंबई विभागात एकमेव प्रशिक्षण केंद्र ठाण्यात

Next

ठाणे : जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या टप्प्यात बॅडमिंटनचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणी खेळांडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया योजनेतून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एक हजार खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाच्या प्रशिक्षणासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ‘सुदृढ आरोग्य आणि व्यक्तिमत्व खेळांतून विकसीत होते, पर्यायाने समाज सुदृढ होतो. त्यामुळे मुला-मुलींनी खेळाची आवड जोपासावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

बॅडमिंटनचे हे आजपासून आज सुरू झालेले प्रशिक्षण केंद्र राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र आहे, असा दावा जिल्हा क्रिडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी केला आहे. ठाणो बॅडमिंटन अकादमीचे संस्थापक श्रीकांत वाड यांनी देखील यावेळी खेळांडूंना मार्गदर्शन केले. यावेळी पर्यटनमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी विजय बाविस्कर, ठाणो महापालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांच्यासह क्रि डा प्रशिक्षक, खेळाडू त्यांचे पालक उपस्थित होते. या प्रशिक्षण केंद्रासाठी 12 वर्षांच्या आतील मुला-मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी 15 मुलं आणि मुलींचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बॅडमिंटन खेळामध्ये शिवछत्रपती क्रि डा पुरस्कार विजेत्या विघ्नेश देवळेकर यांची प्रशिक्षण म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण दादोजी कोंडदेव स्टेडिअम मधील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही सत्रत हे प्रशिक्षण देण्यात येईल

Web Title: Badminton's Khelo India's training center in Mumbai division at Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton