भारिप-वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून उल्हासनगर जिजामाता उद्यानातील शिल्पाची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:20 PM2021-09-08T16:20:47+5:302021-09-08T16:21:04+5:30
कॅम्प नं-४ बालशिवाजी-जिजामाता उद्यान मध्ये विविध ऐतिहासिक शिल्पावर वाढलेले गवत, लहान झुडपे कडून जसवंतीच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ बालशिवाजी-जिजामाता उद्यान मध्ये विविध ऐतिहासिक शिल्पावर वाढलेले गवत, लहान झुडपे कडून जसवंतीच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी केली.
महापालिकेने शिल्पाची देखरेख वेळीच करावी अशी प्रतिक्रिया प्रा. सुरेश सोनावणे यांनी दिली. मराठा सेक्शन परिसरात बालशिवाजी-जिजामाता उद्यान महापालिकेने विकसित केले असून उद्यानाच्या भिंतीला ऐतिहासिक शिवकालीन शिल्प उभारली आहे. पावसाळ्यात शिल्पाची देखरेख ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.
मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे शहाराध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रा.सुरेश सोनावणे, प्रकाश शिरसाट, संजयकुमार सोनकांबळे आदी जणांनी स्मारकाला भेट दिली असता, भिंतीवरील शिल्पावर गवत, लहान झुडपे वाढलेली दिसली. त्यांनी शिल्पावरील गवत, लहान झाडे काढून टाकून, जासवंदी झाडाच्या फांद्यांची छाटणी केली. त्यामुळे झाकलेली शिल्प पुन्हा उजळली गेली. तसेच परिसर स्वच्छ करून, कचरा लगेच कुंडीत टाकण्यात आला. नागरिकांनी स्मारकाचे पावित्र राखावे, असे आवाहन सोनावणे यांनी यावेळी केले.