ईव्हीएम मशीन विरोधात बहुजन समाज पार्टीचे भिवंडीत धरणे आंदोलन
By नितीन पंडित | Published: December 29, 2023 06:07 PM2023-12-29T18:07:14+5:302023-12-29T18:07:49+5:30
भिवंडी : निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टी भिवंडी तालुका अध्यक्ष कैलास ...
भिवंडी : निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टी भिवंडी तालुका अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भिवंडीत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून ईव्हीएम मशीन विरोधात निदर्शने करण्यात आली.
भारतात ईव्हीएम मशीन हॅक करून त्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप होत असून त्याच्याजिवावर भाजपा निवडणुका जिंकून देशात हुकूमशाही पद्धती अवलंबू पहात आहे त्याचा सर्वच राजकीय पक्ष विरोध करीत असून त्यावर बहुजन समाज पार्टी संपूर्ण देशभर आंदोलन करीत आहेत अशी माहिती कैलास गायकवाड यांनी दिली आहे. उप विभागीय अधिकारी कार्यालया समोर निदर्शने केल्या नंतर उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या नावे असलेले आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी दिले.या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी अशोक गायकवाड,राजेश निकम,सिद्धार्थ साळवे,अँड संदीप जाधव,नसीम शेख यांसह पक्ष कार्यकर्ते सहभागी झाले होते.