मशिदीजवळ घोषणा देणाऱ्या तीन आरोपीना जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2023 12:55 PM2023-04-09T12:55:45+5:302023-04-09T14:27:35+5:30

नया नगरमध्ये रमजान दरम्यान मनाई आदेश असताना देखील मशिदी जवळ जाऊन धार्मिक घोषणा देणे , झेंडे फडकवणे असले प्रकार सातत्याने केले गेल्याने तणावाचे वातावरण झाले .

Bail granted to three accused who raised slogans near the mosque | मशिदीजवळ घोषणा देणाऱ्या तीन आरोपीना जामीन मंजूर

मशिदीजवळ घोषणा देणाऱ्या तीन आरोपीना जामीन मंजूर

googlenewsNext

- धीरज परब

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर मधील शम्स मस्जिद जवळ  शुक्रवारी पहाटे इनोव्हा गाडीतून येऊन घोषणा दिल्या प्रकरणी अटक केलेल्या तिघा आरोपी तरुणांना ठाणे न्यायालयाने शनिवारी आधी न्यायालयीन कोठडीचा आदेश देत नंतर त्यांना जामीन अर्ज मंजूर केला . शुक्रवारच्या घटनेतील एक आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचा मीरा भाईंदर अध्यक्ष असून गुरुवारच्या घटनेत राजमुद्रा असलेले भगवे झेंडे  तरुणांनी लावले असल्याने ते मनसेशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे . 

नया नगरमध्ये रमजान दरम्यान मनाई आदेश असताना देखील मशिदी जवळ जाऊन धार्मिक घोषणा देणे , झेंडे फडकवणे असले प्रकार सातत्याने केले गेल्याने तणावाचे वातावरण झाले . नया नगर पोलिसांनी बुधवारच्या गुन्ह्यात ३ आरोपी तर गुरुवारच्या गुन्ह्यात ६ आरोपीना पकडले होते . त्यात १ अल्पवयीन असल्याने अन्य ८ आरोपीना शुक्रवारी न्यायालयाने १० एप्रिल पर्यंत कोठडी दिली होती . 

शुक्रवारी पहाटे पुन्हा शम्स मस्जिद जवळ इनोव्हा गाडीतून आलेल्या ओमकार धाकतोडे,  क्रिस्टीन शेट्टी व जेसल  साळोखे या तिघांनी घोषणा दिल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. इनोव्हा गाडी व आरोपींचे मोबाईल जप्त केले. सदर गुन्ह्यातील आरोपी ओमकार धाकतोडे हा मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेल चा जिलाध्यक्ष आहे. त्याची आई संगीता धाकतोडे ह्या भाजपात आहेत. 

शनिवारी आरोपीना पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले असता आरोपीना नयायलयीन कोठडीचे आदेश देण्यात आले . त्या नंतर आरोपींच्या वतीने केलेले जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केले . न्यायालयाने जमीन देऊन देखील पोलिसांनी मुलास सोडण्या ऐवजी मीरारोडला आणल्या बद्दल संगीता धाकतोडे यांनी संताप व्यक्त केला . आपण वरिष्ठांना तक्रार केली असून आपल्या मुलाची सोमवारी परीक्षा असल्याचे त्या म्हणाल्या. तर न्यायालयीन कोठडीचे आदेश आधी दिल्याने जेल मध्ये आरोपीना सोपवण्या आधी त्यांची कोविड चाचणी आवश्यक असते. न्यायालयाने जमीन मंजूर केल्याचे आदेश मिळाल्या नंतर पोलिसांनी तिघांची शनिवारी रात्री सुटका केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले.  

गुरुवारच्या घटनेत मोहम्मदी मस्जिद जवळ नमाज दरम्यान दुचाकी वरून येऊन ज्या ६ जणांनी झेंडे फडकावत घोषणा दिल्या होत्या. त्यातले भगवे झेंडे हे राजमुद्रा असलेले होते . त्यातील एक अल्पवयीन आरोपीची आई मनसेची पदाधिकारी आहे .  त्या अल्पवयीन सोबतचे अन्य आरोपी हे मनसेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत यांनी मात्र त्या घटनेशी मनसेचा संबंध नसल्याचे सांगितले आहे.सततच्या घटनांमुळे आता नया नगर भागातील ९ प्रवेश मार्गांवर दिवस रात्र पोलिसांनी नाकाबंदी लावली असून रात्री व पहाटे येणाऱ्यांची खास चौकशी केली जात आहे . परिसरात गस्त वाढवली आहे असे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले . 

भल्या पहाटे घडलेल्या दोन घटना व एक दुपारची घटना असली तरी तिन्ही गुन्ह्यातील आरोपीं कडून नया नगर भागात जेवण-खावण साठी आल्याचे कारण सांगितले जात आहे . अन्य भागात राहणारे आरोपी हे भल्या पहाटे खाण्यासाठी नया नगर भागात आल्याचे कारण पोलिसांना सुद्धा पटण्याची शक्यता कमी आहे . आरोपींची चौकशी व जप्त मोबाईलच्या पडताळणी बद्दल पोलीस बोलणे टाळत आहेत . 

Web Title: Bail granted to three accused who raised slogans near the mosque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.