बदलापूरमधील आंदोलनातील १०५ जणांना जामीन, वकील संघटनांचे सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 08:42 AM2024-09-01T08:42:22+5:302024-09-01T08:42:56+5:30

Badlapur Protest News: बदलापुरात चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर उद्रेक होऊन झालेल्या आंदोलनात हजारो नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढून न त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला.

Bail to 105 protestors in Badlapur, support of lawyers' associations | बदलापूरमधील आंदोलनातील १०५ जणांना जामीन, वकील संघटनांचे सहकार्य

बदलापूरमधील आंदोलनातील १०५ जणांना जामीन, वकील संघटनांचे सहकार्य

 बदलापूर - बदलापुरात चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर उद्रेक होऊन झालेल्या आंदोलनात हजारो नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढून न त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. आंदोलनानंतर पोलिसांकडून धरपकड सुरूच असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे काम सुरू आहे. वकील संघटनेने आतापर्यंत तब्बल १०५ आंदोलनकर्त्यांची - जामिनावर सुटका केली.

बदलापूर, उल्हासनगर व कल्याणमधील वकील संघटनांनी रेल रोको, शाळेची तोडफोड रेल रोको आंदोलनात ज्या नागरिकांवर गुन्हे दाखल केले. त्यातील ५८ जणांची जामिनावर सुटका करण्यासाठी वकील संघटनेने हातभार लावला. शाळेची तोडफोड केल्याप्रकरणी ज्यांना अटक केली त्यापैकी ४७ जणांची सुटकेसाठी वकील संघटनेने मदत केली.

बदलापूर आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांची केस मोफत लढण्याचा निर्णय घेतला. वकील संघटनांनी आरोपींना जामीन मिळण्यासाठी योग्य ती मदतदेखील केली. या प्रकरणात अनेक सर्वसामान्य कुटुंबांतील नागरिक असल्यामुळे त्यांना वकील नियुक्त करणे, त्यांची फी देणे आम्ही वकिलांनी केलेले काम एका वकिलाचे नसून, ते संपूर्ण संघटनेचे आहे. कल्याण, उल्हासनगर आणि बदलापुरातील बहुसंख्य वकिलानी आम्हाला या कामात मोलाचे योगदान दिले.
- अॅड. प्रियेश जाधव

शक्य झाले नसते. त्यांच्या कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला असता. बदलापुरातील आंदोलन महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून पेटले. सरकारला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले. आंदोलनात सहभागी झालेल्यांना या खटल्यांकरिता सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी वकील संघटनेने घेतली.

Web Title: Bail to 105 protestors in Badlapur, support of lawyers' associations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.