मीरा भाईंदरमध्ये बेकरी, किराणाला सवलत; फळभाजी, मासे - मटण विक्रीला बंदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:09 PM2020-05-03T17:09:47+5:302020-05-03T17:09:58+5:30
आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी जारी केलेल्या आदेशात 8 मे र्पयत भाज्या, फळे, चिकन - मटण, मासे, अंडी यांच्या विक्रीवर बंदी कायम ठेवली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी फळ - भाज्या, मासे - मटण विक्री वरील बंदी 8 मे र्पयत वाढवली असुन दुसरीकडे बेकरी, किराणा दुकानांना मात्र सुट दिली आहे.
आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी जारी केलेल्या आदेशात 8 मे र्पयत भाज्या, फळे, चिकन - मटण, मासे, अंडी यांच्या विक्रीवर बंदी कायम ठेवली आहे. सदर बंदीला पर्याय म्हणुन सकाळी 9 ते रात्री 11 र्पयत घरपोच सुविधा सुरु ठेवली आहे. किराणा वरील बंदी हटवुन आता किरकोळ दुकानांसह बडे विक्रेते ब्रँडना सवलत दिली असुन बेकरी सुध्दा सकाळी 9 ते दुपारी 3 र्पयत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. दुध डेअरी सकाळी 7 ते 11 आणि औषध दुकाने , पीठाची गिरणी नियमीतपणो सुरु राहणार आहेत.
आयुक्तांनी या आधी बेकरी पहाटे 2 ते 4 या दरम्यान सुरु ठेवण्याचे आदेश काढल्याने सत्ताधारी भाजपाने आयुक्तांवर विशिष्ट वर्गाचा पक्षपातीपणा करत असल्याची टिकेची झोड उठवली होती. नगरसेवक देखील पालिकेच्या व्हॉट्स अॅप ग्रुप मधुन बाहेर पडले होते. परंतु नया नगर पोलीसांनी बेकरी चालकांना नोटीसा बजावुन आवश्यक अंतर व वेळेचे काटेकोर पालन न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्याने बेकरी चालकांची अडचण झाली. आताआयुक्तांनी बेकरी सुरु ठेवण्याचा निर्णय कायम ठेवत त्याच्या वेळेत बदल केला आहे.
मासे घरपोच करुन देण्याची कोणतीच सोय पालिकेने केलेली नाही वा तसे घरपोच करणारायांचे क्रमांक सुध्दा दिलेले नाहित. मासेमारीला एकच महिना उरला असुन मासेमारीला जायचे पण पकडुन आणलेले मासे विकायला मात्र बंदी असा उफराटा कारभार चालला असल्याने हा मनमानी अन्याय चालवला जात असल्याचा संताप कोळणी व मच्छीमारांनी बोलुन दाखवला.