ठाण्यात रंगणार प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीचा बालमहोत्सव, दिव्यांग मुलांचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 04:54 PM2018-01-08T16:54:05+5:302018-01-08T16:57:09+5:30

गेली पाच वर्षे आयोजित करण्यात आलेल्या प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीचा बालमहोत्सव यंदाही रंगणार आहे. दिव्यांग मुलांचा सहभाग हे यंदाच्या बालमहोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

Balamohotsav of the Art Academy, and Divyaang children's participation in Thane | ठाण्यात रंगणार प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीचा बालमहोत्सव, दिव्यांग मुलांचाही सहभाग

ठाण्यात रंगणार प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीचा बालमहोत्सव, दिव्यांग मुलांचाही सहभाग

Next
ठळक मुद्देबालोत्सवात शनिवार १३ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ९.४५ ते दुपारी २ यावेळेतदिव्यांग तसेच विशेष मुलांचे कलाविष्कार सादर होणारस्नेहालय संस्थेच्या संचालिका आॅलिव्हिया डिसुझा यांना फिनिक्स पुरस्कार

ठाणे: प्रारंभ कला अकॅडमी आयोजित यंदाच्या बालोत्सवात यंदा प्रथमच दिव्यांग तसेच विशेष मुलांचे कलाविष्कार सादर होणार आहे. हा महोत्सव शनिवार १३ जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ९.४५ ते दुपारी २ यावेळेत होत आहे. यात दिव्यांग मुले व ठाण्यातील सिग्नल शाळेतील मुलांचाही सहभाग असणार आहे अशी माहिती प्रारंभ कला अकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दिव्यांग मुलांचे कलाविष्कार, सिग्नल शाळेतील बच्चेंकंपनीची धमाल सादरीकरणे आणि बालप्रेक्षकांसह कलाकारांचीही त्याला मिळणारी दाद यांसह यंदाचा बालोत्सव रंगणार आहे. प्रारंभ कला अकॅडमी आयोजित यंदाच्या बालोत्सवात यंदा प्रथमच दिव्यांग तसेच विशेष मुलांचे कलाविष्कार सादर होणार असून स्नेहालय संस्थेच्या संचालिका आॅलिव्हिया डिसुझा यांना फिनिक्स पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शाळा, अभ्यास, परिक्षा यांच्या स्पर्धेत धावणा-या मुलांना कला, सादरीकरणे, धमाल यांचा अनुभव घेता यावा यासाठी प्रारंभ कला अकॅडमीतर्फे दरवर्षी बालोत्सवचा बेत आखला जातो, यंदाच्या सहाव्या बालोत्सवात मात्र पहिल्यांदाच विशेष मुले, तसेच दिव्यांग यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. या मुलांच्या जिद्दीचा हा अनोखा प्रवास पाहण्याची संधी बालप्रेक्षकांसह मोठ्यांनाही यानिमित्ताने अनुभविण्यास मिळणार आहे. महोत्सवात सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचे विद्यार्थी संतवाणी हा सांगितीक कार्यक्र म सादर करणार आहे, संतपरंपरा उलगडण्याचा प्रयत्न बालवारकºयांकडून केला जाणार आहे, त्यासह प्रारंभ कला अकॅडमीचे विद्यार्थी जाईच्या कळ््या हे डोंबाºयांचा जीवनपट उलगडणारे नाटक सादर करणार आहेतच. व्हॅर्न्टोलॉजिस्ट सुचित्रा इंदुलकर या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील बाल रु ग्णांसह मंचावर आगळावेगळा प्रयोग सादर करणार आहेत. त्यासह सिग्नल शाळा, स्नेहालय या संस्थांचे बालकलाकारही मंचावर विविध कलाविष्कार सादर करणार आहेत. बालमहोत्सवात यंदा लहान मुलांसाठी काम करणाºया व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी स्नेहालय संस्थेच्या संचालिका अ‍ॅलोव्हिया डिसुजा यांना फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, महोत्सवाला विविध शाळेतील विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवरही हजेरी लावणार असून शहरातील सर्वांसाठी हा महोत्सव विनामुल्य खुला आहे.

Web Title: Balamohotsav of the Art Academy, and Divyaang children's participation in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.