ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर रंगला बालदिन, मराठी बालनाट्यांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:44 PM2018-11-15T16:44:50+5:302018-11-15T16:50:20+5:30
बालदिनानिमित्ताने आवाज संस्कृती केंद्रातर्फे मराठी बालनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले.
ठाणे : "आचार्य अत्रे कट्ट्यावर ' आवाज संस्कृती केंद्राच्या' बालकलाकारांनी बालदिनानिमित्त सादर केलेल्या ' हुप हुप माकडा ' या नाटकाने बालदिन साजरा झाला. सामाजिक आशय मांडून या बाल कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळविली."
हुप हुप माकडा हे नाटक सादर करुन माकड उड्यानी मंच दणाणून सोडत एक उत्कृष्ट संदेश या नाटकातून यावेळी उपस्थित रसिकांना दिला गेला. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संस्थाचालक माधवी राणे यानी केले होते. केवळ भेटवस्तू,फिरून मज्जा करुन बालदिन साजरा करण्याऐवजी अशाप्रकारे बालदिन साजरा करण्याची ही पद्धत पंडित जवाहर लाल नेहरु यांच्या जन्मदिनी त्याना दिलेली खास भेटच ठरावी अशी नक्कीच होती असे उद्गगार अत्रे कट्टयाच्या विदुला ठुसे यांनी काढले . या बालनाटकातील प्रत्येक बालकलावंत म्हणजे हीरा असून नाट्यकर्मी माधवी राणे यांनी त्यांना योग्य पैलू पाडून तयार केले आहे असे गौरोंदगार लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या संपदा वागळे यांनी काढले. लेखिका शीला वागळे यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे बालनाट्य रसिकांना अनुभवता आले. कार्यक्रमाची सुरुवात करताना मुलांनी एक छान गोष्ट सांगितली.त्यानंतर मुलानी नाटक सादर केले. शेवटी संगीता कुलकर्णी यांनी आभार मानले. या नाटकात कैवल्य राणे, क्षितिज दुबळे, सिद्धार्थ मोरे,वीर म्हात्रे,पुर्वा कोल्हे , वैष्णवी जुवेकर,अक्षता सुराड्कर, सई कळके, राधा कुलकर्णी, वैदेही विरकर या बालकलाकारांनी भूमिका साकारल्या.