बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Published: October 18, 2023 12:00 AM2023-10-18T00:00:30+5:302023-10-18T00:00:46+5:30

दसरा मेळावा तयारी, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेने  मंगळवारी ठाण्यात आयोजित केला होता.

Balasaheb's thoughts are our wealth - Chief Minister Eknath Shinde | बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : त्यांचे शिवसेनेच्या संपत्तीवर केवळ प्रेम आहे. पण, मला संपत्तीचा मोह नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मेळाव्यात व्यक्त केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत, असे सांगत आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दसरा मेळावा तयारी, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेने  मंगळवारी ठाण्यात आयोजित केला होता. या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, संपर्क प्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी, नेते, उपनेते उपस्थित होते. या मेळाव्यात मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 

मागील दसरा मेळाव्याच्या वेळेस आपल्याकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नव्हते. पण निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत. पण, गेल्या महिन्यात शिवसेनेच्या खात्यामधले पैसे ५० कोटी रुपये मागण्याचे पत्र माझ्याकडे आले आणि मी लगेच पैसे द्यायला सांगितले. कारण ही शिवसेनेची संपत्ती आहे आणि त्यांचे प्रेम केवळ त्यावरच आहे. मला संपत्तीचा मोह नाही, हे आधीच सांगितले आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बेईमानी आणि विश्वासघात हा २०१९ मध्येच झाला, त्यामुळे त्यांच्याकडून काही आणखी अपेक्षा नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

हलक्यामध्ये घेतल्यावर काय होतं ते माहित आहे त्यामुळे इतिहासामध्ये मी जाऊ इच्छित नाही मैदान कुठलेही असू द्या मैदान आपल्याला आझाद मैदान मिळालेला ऐतिहासिक आणि गेल्या वेळेस जरी मी ठरवलं असतं तरीसुद्धा शिवाजी पार्कला आपण सभा घेतली असती. कारण माझ्याकडे सगळे अधिकार होते परंतु मी ठरवलं की मी या राज्याचा प्रमुख आहे मुख्यमंत्री आहे कायदा सुव्यवस्था या राज्यांमध्ये शांतता ठेवणं राखणं आपली जबाबदारी आहे आणि मैदानासाठी वादविवाद आपल्याला नको म्हणून मैदान नाही घेतले असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Balasaheb's thoughts are our wealth - Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.