खासदार होताच बाळ्या मामा ॲक्शन मोडमध्ये; काल्हेर येथील शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची केली पाहणी

By नितीन पंडित | Published: June 5, 2024 08:04 PM2024-06-05T20:04:26+5:302024-06-05T20:04:58+5:30

जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आली आहे.

Balya mama in action mode as MP Inspection of unauthorized constructions on government lands at Kalher | खासदार होताच बाळ्या मामा ॲक्शन मोडमध्ये; काल्हेर येथील शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची केली पाहणी

खासदार होताच बाळ्या मामा ॲक्शन मोडमध्ये; काल्हेर येथील शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची केली पाहणी

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर आले आहेत. बाळ्या मामा यांनी बुधवारी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांची बाळ्या मामा यांनी पाहणी केली.

जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आली आहे. काल्हेर येथे सुमारे २६ एकर शासकीय जागेवर शासकीय तसेच वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या जागेवर नागरिकांना दमदाटी करून व अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील ,भरत पाटील,नितीन पाटील या बांधकाम व्यावसायिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे.या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील व त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी व नागरिकांना धमकावत जमिनींवर अतिक्रमण केले असून येथील स्थानिक गुंडांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी केला आहे.या प्रकरणी आपण स्वतः एमएमआरडीए,तहसीलदार व प्रांत तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून या प्रकाराची सर्व कागदपत्र आपण शासकीय यंत्रणेला सोपविणार आहोत असेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.

येथील बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून इन्व्हेस्टर लोकांना व सामान्य घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवत असून दादागिरी व दहशत वाढवली आऊन आज शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मी इथे येऊन पाहणी केली असून मी शेतकऱ्यांना शब्द डिंक होता की मी निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार व तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितले असल्याने आज व्यस्त कार्यक्रम आटोपते घेऊन आज मी या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची पाहणी केली असल्याचेही खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले असून केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष करत आले आहेत मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील बाळ्या मामा यांनी दिला आहे.

Web Title: Balya mama in action mode as MP Inspection of unauthorized constructions on government lands at Kalher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.