गंडा घालणारा भामटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:43 AM2018-05-07T06:43:02+5:302018-05-07T06:43:02+5:30
परदेशात जहाजावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याविरोधात नवी मुंबई, केरळ येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक करून मिळालेल्या पैशांचा वापर तो पब, बारमध्ये अय्याशीसाठी करत असल्याचे उघड झाले.
मीरा रोड : परदेशात जहाजावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याविरोधात नवी मुंबई, केरळ येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक करून मिळालेल्या पैशांचा वापर तो पब, बारमध्ये अय्याशीसाठी करत असल्याचे उघड झाले.
मीरा रोडमध्ये राहणारे परिमल पटेल यांचा इस्टेट एजंटचा व्यवसाय असून त्यांचा मुलगा आकाश (१९) हा परदेशात जहाजावर नोकरी शोधत होता. इंटरनेटवर त्याला परदेशात जहाजावर नोकरी लावणाºया काही एजंटचे नंबर मिळाले. त्याने व वडिलांनी अनेकांशी संपर्क साधला असता त्यातच जस्ट डायलवरून त्यांना सोमय्या रंजन मिश्रा (२६) या एजंटचा क्रमांक मिळाला. मिश्रा याने श्रीलंकेत एका जहाजावर नोकरीसाठी मोठ्या पगाराचे आमिष दाखवून १० लाखांचा खर्च सांगितला. पण, तडजोडीत अखेर पाच लाखांत काम करून देण्याचे दोघांचे ठरले.
मिश्राने आकाश याचे विमानाचे तिकीट, व्हिसा, नियुक्तीपत्र आदी सर्व दिले. २० एप्रिलला आकाश विमानतळावर जाईपर्यंत मिश्रा याने पैसे घेतले. पटेल यांनीदेखील नोकरीचे काम होते, म्हणून मिश्राला चार लाख ६० हजार टप्प्याटप्प्याने दिले. मिश्राने सांगितल्याप्रमाणे आकाश हा कोलंबो येथे पोहोचला असता तेथे दुसरा एजंट भेटला. पण, त्या एजंटकडे चौकशी केली असता मिश्राने सांगितलेल्या नावाचे कोणतेच जहाज नसल्याचे आकाशला समजले. घडलेला प्रकार आकाशने वडिलांना सांगितला असता त्यांनी मीरा रोड पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर निरीक्षक वसंत लब्धे यांच्या मार्गदर्शनाखाली पटेल यांना मिश्राशी संपर्क साधायला सांगितले. पटेल यांनी संपर्क केला असता मिश्रा याने दुसºया जहाजावर नोकरी मिळवून देतो, असे सांगत आणखी पैसे लागतील, तोपर्यंत आकाशला तेथेच राहू द्या, कंपनी खर्च करेल, असे सांगितले. मिश्रा हा पैसे घेण्यासाठी मीरा रोड येथे आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान, कोलंबो येथे आकाशला अन्सूल राणा हा मिश्राकडूनच फसला गेलेला आणखी एक तरुण सापडला. दोघांनी मुंबई गाठून मीरा रोड पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.