ठाण्यात कंत्राटदारांना पालिकेत प्रतिबंध, महापालिका आयुक्तांचे कठोर आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 07:34 PM2017-09-20T19:34:58+5:302017-09-20T19:35:18+5:30

भविष्यात यापुढे कोणत्याही परिस्थितीत पाच(दोन)(दोन) अंतर्गत एकही प्रकरण न करता निविदेशिवाय कुठलेही काम न करण्याचे आदेश देतानाच ठाणे महापालिका कंत्राटदारांच्या पालिकेतील वापरावरही प्रतिबंध घालण्याचे कठोर निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना दिले आहेत.

The ban in the corporators in Thane, the strict orders of the municipal commissioner | ठाण्यात कंत्राटदारांना पालिकेत प्रतिबंध, महापालिका आयुक्तांचे कठोर आदेश

ठाण्यात कंत्राटदारांना पालिकेत प्रतिबंध, महापालिका आयुक्तांचे कठोर आदेश

Next

ठाणे, दि. 20 - भविष्यात यापुढे कोणत्याही परिस्थितीत पाच(दोन)(दोन) अंतर्गत एकही प्रकरण न करता निविदेशिवाय कुठलेही काम न करण्याचे आदेश देतानाच महापालिका कंत्राटदारांच्या पालिकेतील वापरावरही प्रतिबंध घालण्याचे कठोर निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना दिले आहेत. दरम्यान यापुढे कार्यादेशापासून निविदा कामाची सद्यस्थिती महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्याबरोबरच देयके यापुढे विभागाकडे सादर न करता नागरी सुविधा केंद्रात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे आदेशही त्यांनी सर्व अधिका-यांना दिले.

या संदर्भात महापालिका आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेवून सर्व अधिका-यांना सूचना दिल्या. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाच(दोन)(दोन) अंतर्गत प्रकरणांविषयी महासभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने यापुढे निविदा काढल्याशिवाय कोणतीही कामे करू नयेत, असे निर्देश दिले. त्याचप्रमाणे ज्या कामाची निविदा काढली जाते त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा विस्तार करणे अपेक्षित असेल तर करारातील अटी आणि शर्थीप्रमाणे तो 10 टक्केपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे सांगितले. तसेच यापुढे कोणतीही निविदा ही अंदाजित खर्चापेक्षा जास्त असणार नाही आणि जास्त असल्यास ती 5 पाच टक्केपेक्षा जास्त जाणार नाही याची दक्षता घेतानाच ती अंदाजित खर्चापेक्षा जास्त का होते? याची कारणमीमांसा स्पष्ट करून त्यास महापालिका आयुक्तांची मान्यता घ्यावी असे स्पष्ट केले.

दरम्यान, कार्यादेश घेण्यासाठी यापुढे कंत्राटदारास महापालिकेस येण्याची आवश्यकता नसून त्यांना त्यांच्या इमेलवर कार्यादेश पाठविण्यात यावा, असे स्ष्ट करून यापुढे निविदा पूर्व बैठक, निविदा उघडणे, कागदपत्रे तपासणी आणि करारावर स्वाक्षरी करणे याशिवाय ठेकेदारांना महापालिका भवनामध्ये प्रवेश देण्यात येवू नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी सर्व अधिकारी आणि सुरक्षा विभागाला दिले. तसेच देयकासाठी ठेकेदारांना संबंधित विभागाकडे न जाता त्यांनी नागरी सुविधा केंद्र येथे विशेष कक्ष स्थापन करून तिथेच त्यांनी त्यंच्या कामाची देयके सादर करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंता यांना दिल्या. त्याचप्रमाणे यापुढे सर्व निविदा कामाची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर देण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिका-यांना दिल्या.

शहर विकास विभागाच्या अनुषंगानेही श्री. जयस्वाल यांनी दुपारी 3 ते 6 यावेळेतच वास्तूविशारद आणि विकासकांना प्रवेश द्यावा त्या व्यतिरिक्त त्यांना प्रवेश देण्यात येवू नये अशा कडक सूचना त्यांनी सहा. संचालक, शहर विकास विभाग यांना दिल्या.
 

Web Title: The ban in the corporators in Thane, the strict orders of the municipal commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.