श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादिवशी मासांहार बंदी, मनपाचे आदेश
By नितीन पंडित | Published: January 19, 2024 07:49 PM2024-01-19T19:49:46+5:302024-01-19T19:50:07+5:30
शहरातील सर्व मच्छी व मांस विक्री बंद ठेवण्याचे मनपाचे निर्देश
भिवंडी: अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी संपन्न होणार आहे.या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभर उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण आहे भिवंडी शहर संवेदनशील शहर असल्याने सोमवारी शहरातील सर्व मांस व मच्छी विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी शुक्रवारी जाहीर केले आहेत.
या संदर्भात पोलीस प्रशासन व शांतता कमिटी मध्ये झालेल्या बैठकीत देखील या संदर्भात चर्चा करण्यात आली असून शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी मांस विक्रीची दुकाने बंद करण्याच्या निर्णय मनपा प्रशासनाने घेतला असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तर ग्रामीण भागात खारबाव ग्रामपंचायतीने सुरुवातीला संपूर्ण गावात मांस, मच्छी विक्री बंदी करण्याचे जाहीर केले असून अनेक ग्राम पंचायतींनी देखील अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे.