रायझिंग डे निमित्त भिवंडी पोलीस बँड पथकाचे वाद्यवृंद सादरीकरण
By नितीन पंडित | Published: January 4, 2023 06:28 PM2023-01-04T18:28:21+5:302023-01-04T18:28:58+5:30
पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त रायझिंग डे सप्ताह साजरा करून पोलीस दल समाजातील विविध घटकांना पोलीस प्रशासनाची माहिती करून देत असते.
भिवंडी - पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त रायझिंग डे सप्ताह साजरा करून पोलीस दल समाजातील विविध घटकांना पोलीस प्रशासनाची माहिती करून देत असते.या अंतर्गत भिवंडी शहर पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने धामणकर नाका येथे पोलीस बँड पथका च्या वाद्यवृंदा कडून राष्ट्रभक्तीपर सुरावटी वाजविल्या.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे ,पोलीस अधिकारी कर्मचारी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय येथील विद्यार्थी उपस्थित होते.रायझिंग डे निमित्त पोलीस बँड पथका कडून राष्ट्रभक्तीपर गीते सुमधुर सुरावटीत वाजविली जात असताना त्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरीक सहभागी झाले होते.
रायझिंग डे निमित्त भिवंडी पोलीस बँड पथकाचे वाद्यवृंद सादरीकरण
तर नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंजुरफाटा येथील महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालयात मुला मुलींचे स्वसंरक्षणाकरिता कराटे प्रशिक्षण व माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षणाकरिता स्पोर्ट्स मार्शल आर्ट्स अकॅडमी भिवंडीचे सचिव अरविंद जैसवार, फकरे आलम खान, प्रशिक्षक कांचन साही हे त्यांचे सहकाऱ्यांसह उपस्थित होते.या कार्यक्रमात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्वतःचे रक्षण कसे करावे याकरिता काही महत्त्वाच्या सूचना तसेच कराटेचे काही प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.