बँक कर्मचाऱ्यांना कोरोना लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:27+5:302021-03-26T04:40:27+5:30
कल्याण : कोरोनाकाळात सुरुवातीपासून डॉक्टर, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांच्यासह देशातील अर्थव्यवस्थेचा मोठा घटक असलेले बँकेतील ...
कल्याण : कोरोनाकाळात सुरुवातीपासून डॉक्टर, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांच्यासह देशातील अर्थव्यवस्थेचा मोठा घटक असलेले बँकेतील कर्मचारी हे फ्रंटलाइनला काम करत होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लस प्राधान्याने द्यावी, अशी मागणी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहरात केली आहे.
देशामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, २२ खाजगी बँका, ४४ विदेशी बँका, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँका, १४८५ नागरिक सहकारी बँका, ९६ हजार ग्रामीण सहकारी बँका असून यात १५ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. कोरोनामुळे आर्थिक व्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. रेल्वे तसेच बससेवांवर प्रतिबंध असतानाही कामावर हजर राहून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम बँकेतील कर्मचाऱ्यांनी केले आहे. काही कर्मचारी कोरोनामुळे बाधित झाले, तर काहींचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सर्व बँक कर्मचाऱ्यांचा फ्रंटलाइन वर्कर्समध्ये समावेश करावा. त्यांना प्राधान्याने कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
-------------------------