शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्जपुरवठ्यास बँका तयार; १६७ कोटींचे एकूण कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:51 AM2020-05-25T00:51:57+5:302020-05-25T00:52:02+5:30
आतापर्यंत झाले पाच कोटींचे वाटप
ठाणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा ६५ हजार ९०९ हेक्टरवर खरीप हंगाम घेतला जाणार आहे. कोरोनाच्या संकटाचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर होऊ नये, शेतकºयांची आर्थिक कुचंबणा होऊ नये, यासाठी शेतकºयांना पतपुरवठ्याच्या नावाखाली १६६ कोटी ७९ लाख रुपये कर्जपुरवठा करण्याचे नियोजन बँकांनी केले आहे. यापैकी आतापर्यंत पाच कोटींचे वाटप झाले, असे जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी निदर्शनास आणून दिले.
यंदाच्या हंगामात हेक्टरी सरासरी भाताचे २६ क्विंटल, नागलीचे १२ क्विंटल, कडधान्य, तृणधान्य अनुक्रमे सहा क्विंटल आदी भरघोस उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता पिकांचे नियोजन, बी-बियाण्यांची उपलब्धता, रासायनिक खते, औषधे आदींसाठी लागणारे आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच स्तरांतील शेतकºयांना कर्जपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील बँका पुढे आल्या आहेत. यामुळे शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
यामध्ये सार्वजनिक बँकांकडून ५२ कोटी ५0 लाखांचा पत (कर्ज) पुरवठा केला जाणार आहे. खाजगी बँकांकडून २0 कोटी नऊ लाख, ग्रामीण बँका चार कोटी २0 लाख आणि सर्वाधिक ९0 कोटी रुपयांचा पतपुरवठा सहकारी बँकांकडून केला जाणार आहे.
हलगर्जी करणाºया बँकांवर कारवाई?
खरीप हंगाम घेण्यासाठी शेतकºयांना ११ हजार ५00 क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करून देण्याचे नियोजन झाले आहे. खत मागणी व पुरवठा, कृषी निविष्ठा विक्रेत्यांची संख्या, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्ह्यात तैनात केले आहे. शेतकºयांच्या थेट बांधावर खते उपलब्ध करून दिली जाणार आहे. या दरम्यानच्या खर्चासाठी शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडू नये, त्याची आर्थिक कुचंबणा होऊ नये, यासाठी १६७ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा तत्काळ करण्यासाठी जिल्ह्यातील बँकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कर्ज पुरवठ्यास गांभीर्याने न घेणाºया बँकांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.