मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: April 18, 2024 07:39 PM2024-04-18T19:39:54+5:302024-04-18T19:40:04+5:30

या आदेशाचा भंग करून दळवी वागळे इस्टेट भागात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली हाेती.

Banned gangster arrested from Mumbai, Thane; Action of Criminal Investigation Department | मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ठाणे : मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या रोहित सुनील दळवी (२१, रा. नौपाडा, ठाणे) याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिसांनी गुरुवारी दिली.

दळवी याच्याविरुद्ध हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी वागळे इस्टेट परिमंडळाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी त्याला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे या तीन जिल्ह्यांमधून दीड वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश २९ डिसेंबर २०२३ राेजी दिले हाेते. मात्र, या आदेशाचा भंग करून दळवी वागळे इस्टेट भागात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली हाेती.

याच माहितीच्या आधारे युनिट ५च्या पथकाने त्याला १७ एप्रिल राेजी दुपारी अडीचच्या सुमारास वागळे इस्टेट, कामगार हाॅस्पिटलच्या गेटसमाेरील भागातून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Banned gangster arrested from Mumbai, Thane; Action of Criminal Investigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.