ठाण्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिनीचा मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 12:56 PM2019-12-28T12:56:51+5:302019-12-28T12:57:04+5:30
वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे राहणाऱ्या महिलेला दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते.
ठाणे: कळव्यातील पालिका रुग्णालायामध्ये बाळंतिनीचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत गोंढळ घातला.
वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे राहणाऱ्या महिलेला दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी तिचे सिझेरीयन झाले होते. नॉर्मल असतानाही शनिवारी सकाळी त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाइकांना धक्का बसला.
या बाळंतिनीचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. याबाबत रुग्णालयाच्या डीन यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मीटिंगचे कारण देत फोन कट केला.