बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप
By admin | Published: July 8, 2017 05:45 AM2017-07-08T05:45:43+5:302017-07-08T05:45:43+5:30
स्वत:च्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : स्वत:च्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एन. एम. वाघमारे यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली.
कल्याण तालुका परिसरातील टिटवाळा भागात आरोपी राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी रस्त्यावरील दगड मातीचे काम करण्यासाठी मजुरीला जात होती. मात्र, आरोपी काही काम न करता घरी राहत असे. त्याला चार वर्षांची मुलगी व तिच्यापेक्षा एक लहान वयाचा मुलगा होता. घरात कोणी नसताना त्याने मुलाला घराबाहेर खेळण्यासाठी पाठवले आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला व तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने घडला प्रकार आईला कथित केला. त्यानंतर पतीविरोधात तिने टिटवाळा पोलिस ठाण्यात धाव घेतली. ही घटना २०१२ मध्ये घडली.
आरोपीला पोलिसांनी अटक करत आरोपपत्र सादर केले. हा खटला २०१२ पासून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. त्याची अंतिम सुनावणी शुक्रवारी झाली. या खटल्यात सरकारी वकील अॅड. वाय. एम. पाटील व मंगेश देशमुख यांनी काम पाहिले. या प्रकरणात महिला पोलीस भारती परदेशी यांनी काम पाहिले.
मुलीला ठार मारण्याची धमकी
कोणी नसताना त्याने मुलाला घराबाहेर खेळण्यासाठी पाठवले आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला व आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने घडला प्रकार आईला कथित केला.