बदलापूरचे बाप्पा निघाले परदेशवारीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:56+5:302021-06-04T04:30:56+5:30
बदलापुरातील निमेश जनवाड हा तरुण गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करून परदेशात पाठविण्याचे काम करतो. त्याच्या गणेशमूर्तींना अमेरिकेसह आखाती ...
बदलापुरातील निमेश जनवाड हा तरुण गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करून परदेशात पाठविण्याचे काम करतो. त्याच्या गणेशमूर्तींना अमेरिकेसह आखाती देश आणि ऑस्ट्रेलियातही मोठी मागणी आहे. बदलापूरहून अमेरिकेच्या वारीला निघालेल्या २ हजार बाप्पांची पहिली खेप बुधवारी रवाना झाली. निमेश याचे गणेशमूर्ती निर्यातीचे हे सहावे वर्ष आहे. २०१९ साली निमेशने साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविल्या होत्या. मागील वर्षी निर्यात बंद असल्याने त्याला तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता. मात्र या वर्षी त्याला तब्बल १० हजार गणेशमूर्तींची ऑर्डर आहे. लवकरच समुद्रीमार्गे या मूर्ती अमेरिका, युरोप, आखाती देश आणि ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. त्यातील काही मूर्ती रवानादेखील झाल्या आहेत.
...............
दरवर्षी गणेशमूर्ती निर्यात केल्या जातात. गेल्या वर्षी कोरोनामुळे निर्यातबंदी असल्याने गणेशमूर्ती जाऊ शकल्या नव्हत्या. मात्र यंदा परदेशातून ऑर्डर आल्या आहेत.
- निमेश जमवाड, तरुण उद्योजक
-------------