बारामती अॅग्रो तर्फे मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:01 PM2021-05-21T21:01:39+5:302021-05-21T21:03:13+5:30
Mira Bhayander Municipal Corporation : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता आता पासूनच त्यासाठी पालिका सज्ज होत आहे अशा परिस्थितीत बारामती अॅग्रोने दिलेले ऑक्सिजन कांसंट्रेटरची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
मीरारोड - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि बारामती अॅग्रोचे कार्यकारी संचालक रोहित पवार यांच्या मार्फत मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विनामूल्य देण्यात आले. राज्यातील कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये, त्यांचा जीव वाचावा यासाठी बारामती अॅग्रो तर्फे राज्यातील कोरोना रुग्णालयांना ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येणार आहेत. त्यापैकी मीरा भाईंदर शहराला शुक्रवारी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले.
पालिकेच्या प्रमोद महाजन कोरोना उपचार केंद्रात पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कडे हे ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले. यावेळी मीरा-भाईंदरचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे सह विक्रम तारेपाटील, ममता मोराईस, गुलामनबी फारुकी, सुरेश पांढरे, प्रवीण शाह आदी पदाधिकारी व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त ढोले यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्या बद्दल बारामती एग्रो आणि आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.
आयुक्त म्हणाले की, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता आता पासूनच त्यासाठी पालिका सज्ज होत आहे अशा परिस्थितीत बारामती अॅग्रोने दिलेले ऑक्सिजन कांसंट्रेटरची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. शहरातील सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी कोरोना साथरोगाच्या संकटात सतत सहकार्य केले असून या पुढेही कोरोनावर मात करण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.